Ticker

6/Breaking/ticker-posts

मतदार कार्डाला आधार क्रमांक जोडण्यासाठी विशेष मोहिम.

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर, :-- - २२५ अहमदनगर शहर व नगर तालुक्यातील २२३-राहुरी २२४- पारनेर, २२६-श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधु भगिनींना कळविण्यात येते की,  भारत निवडणूक आयोगाद्वारे कालबध्द पध्दतीने सर्व मतदारांकडुन आधार क्रमांक प्राप्त करुन घेण्यासाठीचा कार्यक्रम ०१ ऑगस्ट, २०२२ पासून सुरु करण्यात आला आहे.


 लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० मधील कलम २३ मधील दुरुस्तीन्वये सर्व विद्यमान मतदारांकडुन आधार संकलनाचा उद्देश मतदाराची ओळख प्रस्थापीत करणे व मतदार यादीतील प्रमाणीकरण करणे हा आहे. दिनांक १० , ११ ,  १७ व १८ सप्टेंबर,२०२२ या दिवशी मतदान कार्ड आधार कार्डला जोडणेबाबत विशेष मोहिम आयोजित आली आहे. 


सदरील दिवशी मतदान केंदावर मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) उपस्थित असणार आहेत.  सर्व मतदारांनी आपआपल्या मतदान केंद्रावर मतदान कार्ड व आधार कार्ड सोबत आणून सदर दिवशी आपले मतदान कार्ड आधारकार्डशी जोडणी करुन घ्यावे असे आवाहन अहमदनगरचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या