Ticker

6/Breaking/ticker-posts

' त्या ' विकृत प्राध्यापकावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा ; संतप्त पालकांची मागणी  लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

शेवगाव :-  शेवगावच्या ' त्या ' नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या युवतीसी लगट करणारा तो प्राध्यापक विकृत आहे. या प्रकरणी पोलिसांनी स्वतः फिर्यादी व्हावे व त्याचेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा,अशी मागणी पालकांनी केली आहे.


        

 ग्रामीण भागातील पालक आपल्या पोरीसोरींना प्राचार्य, प्राध्यापकांच्या भरवशावर कॉलेजला पाठवतात.मात्र.तेथे उलटेच घडत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दोन दिवसापूर्वी युवतीसी  किळसवाना प्रकार करणारा मराठी विभागाचा प्रमुख असलेला व पीएचडी मिळवलेला ' तो ' प्राध्यापक विकृत असून कित्येक वर्षापासून महाविद्यालयीन युवतींच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन अत्याचार करत आहे. यासंदर्भात काहीजण महिला आयोगाकडे दाद मागणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे.


         परंतु,इज्जत व इभ्रतीपोटी कोणीही तक्रार करण्यास पुढे येत नाही,ही वस्तुस्थिती आहे. प्रकरण सिरीयस असल्याने या प्रकरणात पोलिसांनी स्वतः फिर्यादी व्हावे व न्यायालयाकडे संबंधित प्राध्यापकाची नार्को टेस्ट करण्याची परवानगी घ्यावी,अशी सर्वसामान्य पालकांची मागणी आहे.संबंधित युवतीच्या नातेवाईकांनी कॉलेज कॅम्पसमध्ये प्राध्यापकाची धुलाई केली.पोलीस घटनास्थळी पोहोचले.त्यास पोलीस स्टेशनमध्ये आणले.मात्र, गुन्हा दाखल केला नसल्याने भविष्यात हे प्रकरण पोलिसांच्या अंगलट येऊ शकते.

        

संबंधित प्राध्यापकाच्या वेतनावर दरमहा लाखो रुपये खर्च करणाऱ्या महाविद्यालयाच्या मॅनेजमेंटने ही गंभीर बाब संस्था प्रमुखांच्या निदर्शनास आणून त्या प्राध्यापकास तात्काळ सस्पेंड करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.या महाविद्यालयात युवती सुरक्षित नसल्यामुळे भविष्यात या कॉलेजमध्ये पाल्याचे ऍडमिशन घ्यावे की नाही ? याबाबत पालकांनी विचारमंथन करण्याची गरज आहे.या कॉलेजमध्ये विविध कारणांसाठी महाविद्यालयीन युवक - युवतीकडून वेगवेगळ्या शुल्काच्या नावाखाली भरमसाठ रक्कमा आकारल्या जातात. मात्र,पावत्या दिल्या जात नाही. ही रक्कम संस्था प्रमुखाच्या घशात जाते की काय ? अशीही चर्चा यानिमित्ताने झडत आहे. युवती छेडछाड प्रकरणी आवाज उठविणाऱ्या वृत्तपत्र प्रतिनिधींचे शेवगावकरांनी आभार व्यक्त केले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या