Ticker

6/Breaking/ticker-posts

समाजकल्याण आयुक्तांचा जामखेड शासकीय वसतिगृह, निवासी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद..!

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर, १७ सप्टेंबर 

 समाजकल्याण विभागात 'सेवा पंधरवडा ' उपक्रमांचा आयुक्तांचा विद्यार्थ्यांशी आस्थेवाईक संवादाने सुरूवात झाली. यानिमित्ताने राज्याचे समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी जामखेड येथील शासकिय वसतिगृह व निवासी शाळातील विद्यार्थ्यांशी हितगुज करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या .


समाजकल्याण विभागाच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत 'सेवा पंधरवडा' हा उपक्रम राबविण्यात येत असून त्याअंतर्गत विविध उपक्रमांना प्रारंभ झाला आहे. या उपक्रमाची सुरुवात आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी स्वतः अहमदनगर येथून विद्यार्थ्यांशी संवाद साधून केली.  शासकीय वसतिगृहात मिळणाऱ्या सोयी-सुविधा व उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सुविधांबाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.


 "शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सोयी- सुविधांचा विद्यार्थ्यांनी सुयोग्य वापर करून आपली गुणवत्ता कशी सुधारेल यासाठी सतत प्रयत्नशील राहणे स्पर्धेच्या युगात आवश्यक आहे." असे मत आयुक्त डॉ.नारनवरे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी आयुक्त यांनी वसतिगृहाची व निवासी शाळेची पाहणी केली. त्यांच्या समवेत अहमदनगर समाजकल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांच्यासह समाज कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र जातीचे दाखले शाळा महाविद्यालयांमध्ये वितरित करणे, अनुसूचित जातीच्या वस्त्यांमध्ये जाऊन जनजागृती करणे व आदर्श वस्त्या निर्माण करणे, कार्यालयात प्राप्त झालेल्या प्रकरणांवर तात्काळ जलद गतीने निर्णय घेऊन प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करणे, कर्मचारी दिनाचे आयोजन करून कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली काढणे तसेच कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक लाभ देण्यासाठी आवश्यक त्या पूर्तता कर्मचाऱ्यांकडून करून घेणे, झिरो पेंडन्सी उपक्रम राबवणे, ज्येष्ठ नागरिकांना साठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजन करण्यात यावे, दिव्यांग बांधवांना वैश्विक प्रमाणपत्र प्रदान करणे, तृतीयपंथी व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळख पत्र तसेच आधार कार्ड व त्या अनुषंगाने आवश्यक प्रमाणपत्र देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करणे,  शासकीय वसतिगृह व शासकीय निवासी शाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी विशेष विविध कार्यक्रमांचे/ व्याख्यानाचे आयोजन करणे, शासकीय कार्यालयातील अभिलेखे अद्यावत करणे, कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवणे, यासह नागरिकांना आवश्यक असलेल्या सुविधा तात्काळ देण्यासाठी उपाययोजना या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे‌.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या