Ticker

6/Breaking/ticker-posts

मनातील राहिलेली विकासाची कामे पूर्ण करू - सौ. प्रभावती ढाकणे



मिडसांगवी येथे विविध  विकास कामांचे  उद्घाटन करताना जि. प. सदस्या सौ. प्रभावती ढाकणे, समवेत ग्रामस्थ.


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

खरवंडी कासार :  जिल्हापरीषद सदस्या म्हणुन विकासाची कामे कराताना तुमची साथमला मिळाली आहे. कोरोनामुळे दोन वर्षे काहीच करता आले नाही. निधीलाही मर्यादा आल्या. मनात असलेली अनेक विकासाची कामे करताना अडचणीआल्या . जिल्हा परीषदेला पुन्हा संधी मिळेल आणि तेव्हा मात्र मनातील विकासाची राहीलेली कामे करण्याचे काम करील, असा विश्वास जिल्हा परिषदेच्यासदस्या प्रभावती ढाकणे यांनी व्यक्त केला.


 मिडसागंवी गावातील सुमारे ३० लाख रुपयाच्या विविध विकास कामाचे भुमीपुजन व उद्घाटन बुधवारी  प्रभावती ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आली. सालसीदबाबा संस्थानचे महंत हनुमानशास्त्री, गटविकास अधिकारी डॉ.जगदिश पालवे, अभियंताअनिल सानप, बापुसाहेब पठाडे, किरण खेडकर, सरपंच मुक्ताबाई हजारे, उपसरपंच विष्णु थोरात, ग्रामपंचायत सदस्य शौकत शेख आबासाहेब जायभाये, महारुद्र किर्तने,अनिल जाधव, राजेंद्र जगताप, एकनाथ आंधळे , दिपक ढाकणे व ग्रामस्थ उपस्थीत होते


 यावेळी बोलताना ढाकणे म्हणाल्या, भालगाव जिल्हा परीषद गटात प्रत्येक गावात विकासाची कामे केली आहेत. रस्ते ,जलसंधारण, शाळाखोल्या, बंधारे, पाणी योजना अशी विविध कामे केली आहेत. कोरोनामुळे दोन वर्षे वाया गेली. आता कामाला निधी मिळविण्यासाठी आगामी काळात कामे करु. मला जनतेने खुपप्रेम दिले आहे. तुमचे पाठबळ हीच माझी शक्ती आहे. प्रस्ताविक ग्रामसेवक  एकनाथ आंधळे यांनी केले. महादेव सुळ यांनी सुत्रसंचालन केले. विष्णु थोरात यांनी आभार मानले.


 लम्पी आजाराचा गावा गावांत प्रवेश

मालेवाडी, भाजवाडी, जवखेडे, आल्हनवाडी, घाटशिरस या गावात जनावरांना आजार झाल्याचे उघड झाले आहे. जनावरांना लसीकरण करण्याचे काम सुरु आहे. गोठे स्वच्छ ठेवुन डास व  माशांचा बंदोबस्त करण्यासाठी फवारणी करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतींनी काळजी घ्यावी. उपाययोजना कराव्यात असे आवाहन गटविकास अधिकारी डॉ.जगदिश पालवे यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या