Ticker

6/Breaking/ticker-posts

अहमदनगर जिल्ह्यातील रस्ता दुरुस्तीचे काम त्वरीत करा - महसूल मंत्री विखे पाटील यांचे आदेश

 शिर्डी विमानतळ, निळवंडे व कुकडी  प्रकल्प भूसंपादन आदींबाबत बैठकीत चर्चा
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)  
मुंबई:- अमदनगर जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडीया आणि नॅशनल हायवे यांचे मार्फत सुरू असलेल्या कामाबाबत भूसंपादन, गौण खनिज व इतर विषयासंदर्भात येणाऱ्या अडचणीबाबत तसेच निळवंडे व कुकडी प्रकल्पामधील भूसंपादन व इतर अडचणींसंदर्भात आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) मार्फत करावयाच्या शिर्डी विमानतळ येथील भूसंपादन व विकास प्रकल्पाच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या अडी-अडचणींसंदर्भात महसूल व पशुसंवर्धन  मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी  आढावा घेऊन सूचना दिल्या.

या बैठकीत अहमदनगर-मनमाड आणि अहमदनगर-पाथर्डी रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा असा आदेश देण्यात आला. त्याचबरोबर साकळाई योजना, कुकडी पाणी व निळवंडेच्या प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा झाली.

तसेच शिर्डी विमानतळ येथे नाईट लँडिंग आणि टर्मिनल बिल्डिंगच्या कामाबाबत देखील चर्चा या बैठकीत करण्यात आली.
याप्रसंगी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार  सदाशिव लोखंडे, माजी मंत्री तथा आमदार प्रा. राम शिंदे, आमदार  रोहित पवार, आमदार संग्राम जगताप, माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले, माजी आमदार वैभव पिचड,  भाजप जिल्हाध्यक्ष  अरुण मुंढे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडीया (NHAI) तसेच नॅशनल हायवेचे सर्व अधिकारी, पाटबंधारे विभागाचे सर्व अधिकारी व विमानतळ प्राधिकरणाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या