लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर :- नगर अर्बन बँकेच्या रिक्त झालेल्या चेअरमनपदावर ज्येष्ठ संचालकांची नुकतीच निवड करण्यात आली. या निवडीनंतर झालेल्या भाषणांमध्ये नूतन चेअरमन चे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देणे अपेक्षित असताना घडले वेगळेच. सर्व सामान्य सभासदांना आधार देऊन न्याय देण्याची भूमिका घेणाऱ्या बँक बचाव कृती समितीवर तोंडसुख घेण्याचे काम प्रस्थापित संचालकानी केल्याचा पलटवार समितीचे प्रणेते राजेंद्र गांधी यांनी केला आहे.
गांधी यांनी पुढे म्हटले आहे की , नगर अर्बन बँकेचे विद्यमान संचालकांचे वादावादी तून,व एका थकीत कर्जदाराला एका संचालकाचे वडीलांनी एक कोटी रूपयांची लाच मागितलेचे जाहीर आरोपावरून निर्माण झालेला व भर रस्त्यावर झालेल्या तमाशातून पुर्वीचे चेअरमन चे राजीनामा नाट्य घडले.
या लाजीरवाणे प्रसंगानंतर रिक्त झालेल्या चेअरमनपदावर काल दि 13/09/2022 रोजी दुसरे चेअरमनची निवड करणेची औपचारिकता पुर्ण करणेत आली.रिजर्व बँकेने चोर ठरविलेल्या,बँकेने व बँक बचाव समिति ने ज्या लूटारू आरोपींवर पोलीस फिर्यादी दाखल केल्या आहेत अशा लूटारूंनी बँक बचाव समिति वर आगपाखड करणारे भाषणे केली.
या लूटारूंना बँक बचाव समिति ची एवढी दहशत बसली आहे की प्रसंग कोणताही असो यांना जळी स्थळी बँक बचाव समिति च दिसते. बँक बचाव समिति वर लूटारूंची चीडचीड होणे स्वाभाविक आहे कारण ठेवीदारांचे पुर्ण 1250 कोटी लूटणेचा यांचा मल्टीस्टेट प्लान फसला गेला.ठेवीदारांना तब्बल 900 कोटी परत मिळालेत व राहीलेले 300/350 कोटी ठेवीदारांना परत मिळावेत म्हणून बँक बचाव समिति या लूटारू टोळीवर बारीक लक्ष ठेवून आहे.
आता कोणती निवडणुक नाही मग बँक बचाव समिति वर टिका करणारी तीच तीच कँसेट वाजवणारे सस्पेंस खातेचे दरोडेखोरांचा हेतू चांगला नव्हता व बँक पुर्ण लूटून खाणे केवळ बँक बचाव समिति मुळे शक्य झाले नाही याचा राग येणे हे निश्चित आहे.
नगर अर्बन बँकेला पुर्ण लूटणेत आलेले अपयशातून नैराश्य आलेले बालीश बुध्दी व्यक्ति बालीश भाषणे करून स्वतः चे हसू करून घेत आहे.या बालीश नेत्याला भाषण कोण लिहून देते कोणास ठाऊक. व्यक्ति ची बुध्दि एवढी बालीश आहे की या व्यक्ति ला समोरासमोर चर्चेचे आव्हान द्यायची लाज वाटते.
नगर अर्बन बँकेचे पुर्वीचे चेअरमन राजेंद्र अग्रवाल वसूलीचे काम चांगले करत होते म्हणून त्यांना राजीनामा देणेस भाग पाडणारे षढयंत्री नेते पासून नूतन चेअरमन ने सावध राहीले पाहीजे व साम दाम दंड भेद निती वापरून नगर अर्बन बँकेची वसूली केली पाहिजे.
तरच.. नगर अर्बन बँकेला भवितव्य
बँक बचाव समिति वर सतत टिका करणारी व्यक्ति त्याचे आयुष्यात अद्याप एखादे लहान पतसंस्थेचा संचालक म्हणून देखील निवडून आलेली नाही. वडीलांचे कर्तुत्वावर दिवस काढणारांनी अगोदर स्वतः ची स्वतंत्र ओळख निर्माण करावी. एखादे पतसंस्थेचे संचालक म्हणून निवडून येवून दाखवावे व नंतर बँकींग वर बोलावे. अशी घणाघाती टीकाही गांधी यांनी केली आहे.
0 टिप्पण्या