लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर- दि. 27 सप्टेंबर
अहमदनगर-
शिक्षण विभागात(प्राथमिक, माध्यमिक
व उच्च माध्यमिक) सुमारे एक लाख पदे रिक्त आहेत. भरती प्रक्रिया बंद करण्याचा
निर्णय शिक्षण विभागाला लागू केला आहे याला शिक्षक भारतीचा तीव्र विरोध आहे. हा
निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा राज्य सरकार विरोधात आंदोलन छेडले जाईल असा इशारा
शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी दिला आहे.
शिक्षकांशिवाय शाळा सुरू कशा राहणार? याचा विचार शासन कधी करणार?
१५ आँगस्ट २०१५ च्या शासन निर्णयामुळे यापूर्वीच कमी केलेले
कला-क्रीडा शिक्षक संचमान्यतेत पुन्हा आलेले नाहीत. विषयाला शिक्षक नसल्याने
शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. ११ डिसेंबर २०२०
मध्ये पन्नास हजार शिपाई पदेही संपुष्टात आणली आहेत.
सर्व
शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढील राज्यव्यापी आंदोलनासाठी तयार रहावे. असे
आवाहन शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल
गाडगे तसेच शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष
आप्पासाहेब जगताप, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, सचिव विजय कराळे, महिला जिल्हा अध्यक्ष आशा मगर. विनाअनुदानितच्या अध्यक्षा रूपाली कुरूमकर यांनी केले आहे.
तसेच या
आंदोनानत सर्वानी सहभागी व्हावे, असे आवाहन
मोहंमद
समी शेख, योगेश
हराळे, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरू, उच्च माध्यमिकचे जिल्हा सचिव महेश पाडेकर, संभाजी
पवार, संजय भुसारी .हनुमंत रायकर, नवनाथ
घोरपडे, सुदाम दिघे, संजय पवार,
संतोष देशमुख, किसन सोनवणे, संजय तमनर, कैलास जाधव, संतोष शेंदुरकर,
संजय भुसारी, सिकंदर शेख, रेवन घंगाळे,जॉन सोनवणे,महिला
जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर,
शकुंतला वाळुज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर, सोनाली
अकोलकर आदींनी केले.
0 टिप्पण्या