Ticker

6/Breaking/ticker-posts

बापरे...खतरनाक ; नरभक्षक बिबट्याने घेतला महिलेच्या नरडीचा घोट

 

बिबट्याचा वृद्ध महिलेवर थरारक हल्ला ; झोपेतील महिलेला सुमारे हजार फूट नेले  फरफटतलोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

संगमनेर : शेळीच्या  शिकारीच्या लालसेने गेलेल्या बिबट्याने एका ६२ वर्षीय  महिलेवर  अचानक प्राणघातक हल्ला चढवीत तिच्या नरडीचा घोट घेतला.  त्यानंतर सदर महिलेच्या मानेला पकडून बिबट्याने तिला फरपटत सुमारे  हजार फूट जंगलात ओढत नेल्याची थरारक घटना आज मंगळवारी पहाटे पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द शिवारातील चंदन टेकडी परिसरात घडली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली.

  मिराबाई रामभाऊ मेंगाळ (वय ६२ रा सावरचोर मेंगाळवाडी) या बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या वयोवृद्ध महिलेचे नाव आहे.

        याबाबत घडलेली हकीगत अशी की, संगमनेर तालुक्यातील मूळचे सावर चोर मेंगाळवाडी या आदिवासी वाडीतील रहिवासी असणाऱ्या मीराबाई रामभाऊ मेंगाळ ही आदीवासी समाजाची महिला निमगाव खुर्द शिवारातील चंदन टेकडी परिसरातमध्ये राहत होती. ती शेळ्या पाळून आपला उदरनिर्वाह करीत असे ही वृद्ध महिला सोमवारी आपल्या पाच रटाच्या छपरामध्ये  अंगावर काळ्या रंगाची घोंगडी घेऊन झोपलेली होती.  मंगळवारी पहाटे पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास झोपेमध्ये असताना अचानक शेळीच्या शिकारीच्या लालसेने आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढ  विला अन त्या महिलेच्या मानेला पकडून ती राहत असणाऱ्या छपरापासून सुमारे  हजार फूट अंतरापर्यंत फरफटत ओढत नेले. महिलेच्या गळ्याला व छातीला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या जखमातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

     महिलेवर हल्ला झाल्याची वार्ता वाऱ्यागत संपूर्ण निमगाव खुर्द, पेमगिरी ,सावरचोर, मेंगाळ वाडी परिसरात पसरली. माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

महिलेवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला असल्याची माहिती निमगाव खुर्द गावच्या वन कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब गोपाळे यांनी  वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे यांना दिली . गावचे पोलीस पाटील गोरक्ष गोपाळे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. 


माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे हे आपल्या वन पथकातील वनपाल संगीताताई कोंढार, जोशना बेंद्रे वराकेश कोळी या तिघांनीघ टनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून एकच घबराट पसरली आहे .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या