Ticker

6/Breaking/ticker-posts

केमिस्ट असोसिएशनला वैभव मिळवून द्यावे; नगरसेविका वंदनाताई ताठे

  


 नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार.

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर :- अहमदनगर शहर व तालुका केमिस्ट असोसिएशनच्या कार्यकारणी व नूतन पदाधिकऱ्यांनी संस्थेला वैभव मिळवून द्यावे, असे आवाहन नगरसेविका वंदनाताई ताठे यांनी केले.


माजी अध्यक्ष दत्ता गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली केमिस्ट सेवा पॅनलने सर्वाधिक जागा जिंकून या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. त्याबद्दल नगरसेविका वंदनाताई ताठे यांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.


यावेळी अध्यक्ष दत्ता भाऊ गाडळकर, उपाध्यक्ष भारत सुपेकर, सचिव मनीष सोमाणी, खजिनदार मनोज खेडकर, सह सचिव मनीषा आठरे, संचालक -  युवराज खेडकर, अवधूत बोरुढे, अमित धाडगे, रुपेश भंडारी,  पूजा सातपुते, आशुतोष पोकळे, कमलेश गुंदेचा, अभिजित गांगरदे, राहुल पवार, सुधाकर इंगळे, सचिन धागे, राहील जाधव , ज्ञानेश्वर पठारे, अनिल क्षिरसागर, संदीप डहाळे, सागर फुलसौंदर, संदीप कोकाटे, आदेश जाधव आदींचा पुष्पुच्छ, शाल, श्रीफळ देऊन नगरसेविका वंदनाताई ताठे व परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.


या प्रसंगी उपस्थित शहर व तालुका केमिस्ट असोसिएशनच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या हस्ते श्री महालक्ष्मी गणेश मंडळाचे गणेश पूजन व आरती करण्यात आली. यावेळी ईश्वर पडोळे, भाऊसाहेब भगत, सचिन भाऊ ताठे, राहुल ताठे, प्रशांत ताठे, ब्रिजेश ताठे, ओमकार ताठे, ऋषिकेश ताठे, संकेत ताठे, दिपक खेडकर, दत्तात्रय कजबे, अरुण शिंदे , आशिष भगत, अनुराग पडोळे, मयुर पडोळे, प्रतीक चौधरी, भाऊसाहेब शिंदे,शरद जाधव, सूरज ताठे, सुवर्णा ताठे, सोनाली ताठे, मनीषा ताठे, संगीता ताठे, अंजू ताठे, सुलाबाई खेडकर यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला, पुरुष, युवक, मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या