Ticker

6/Breaking/ticker-posts

कर्जत -जामखेड विजेसाठी 120 कोटीच्या आराखड्याला शासनाकडून मंजुरी ; आमदार रोहित पवारांचा पाठपुरावा

 



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

कर्जत -जामखेड

कर्जत - जामखेड मतदार संघातील विविध गावांची वीजेच्या संदर्भात असलेली अडचण लक्षात घेऊन नवीन उपकेंद्र उभारावीत व जुन्या उपकेंद्रांची क्षमता वाढवावी याकरिता आपण शासन दरबारी पाठपुरावा करीत होतो , त्या प्रयत्नांना यश आले  असून याकरिता 120 कोटी रूपय खर्चाची कामे  मंजूर झाली आहेत. अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.


यापूर्वी नायगाव, दिघोळ व घुमरी येथील नवीन उपकेंद्राला मंजुरी मिळाली होती व राशीनच्या वीज उपकेंद्राची क्षमता वाढवण्याला ही मंजूरी मिळाली होती. यापैकी काही कामे पूर्ण झाली आहेत तर काही सध्या निविदा स्तरावर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आता नव्याने चिलवडी व चोंडी येथे नवीन उपकेंद्र उभारणीसाठी शासनाच्या प्रणाली सुधारणा पद्धत  या योजनेतून मंजुरी मिळाले आहे तसेच मिरजगाव भांबोरा खांडवी कुळधरण भानगाव येथे असलेल्या उपकेंद्रांची क्षमता वाढविण्याला देखील शासनाने मंजुरी दिली आहे.


याबरोबरच वीज वितरणाची हानी कमी करण्यासाठी 53 . 76 कोटी तर वीज वितरण प्रणाली सुधारणा करण्यासाठी 66 .76 कोटी रुपये अशी एकूण 120 . 48 कोटी रुपयांच्या आराखड्याला शासनाने मंजुरी दिल्याचेही आमदार रोहित पवारांनी सांगितले.


शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्या सोडवण्यासाठी सहा कोटींपेक्षा अधिक ‘आमदार निधी’ देखील वापरल्याचे सांगून  मतदारसंघातील विजेच्या समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा केल्याचे ते म्हणाले. तसेच त्याचेच फलितरूप म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली विजेची समस्या दूर होण्यास मोठी मदत होत असल्याचे समाधान आमदार पवार यांनी व्यक्त केले. नवीन वीज उपकेंद्र मंजूर झाल्याने व पूर्वीच्या उपकेंद्राची क्षमता वाढविण्यासाठी आर्थिक तरतूद झाली. वीज पुरवठा सुरळीत रहावा, यासाठी विविध ठिकाणी नवीन लिंक लाइनचे काम, नवीन विद्युत रोहित्र बसवणे, शेतातील नादुरुस्त झालेले रोहित्र त्वरित बदलून देणे अथवा दुरुस्त करून देणे सोपे होणार आहे.


कर्जत व जामखेड दोन्ही तालुक्यात आपण सर्वेक्षण करून घेतले व आराखडा बनविला. हा आराखडा  सरकारकडून मंजूर करून घेतला. त्यामुळे वीज वितरणाच्या पायाभूत सुविधा सुधारण्यास मदत होईल, शेतकऱ्यांना मोठ्या फायदा होईल. असा विश्वास आमदार  पवार यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या