Ticker

6/Breaking/ticker-posts

जागतिक पर्यटन दिन विशेष..! नगरमध्ये चांगला वाव.. साईबन ठरतेय… सध्या पर्यटकांचे आकर्षण..

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

              

नगर- दि. 27 सप्टेंबर.. म्हणजेच जागतिक पर्यटन दिन.जगभरात हा दिवस जागतिक पर्यटन दिवस म्हणून १९८० पासून याच दिवशी साजरा करण्यास सुरवात झाली. जागतिक पर्यटन दिन  कारण संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेची स्थापना १९७० मध्ये याच दिवशी झाली होती.सन २०१८ पासून ‘पर्यटन आणि डिजिटल परिवर्तनहे मुख्य उद्दिष्ट ठेवून पर्यटन दिन साजरा केला गेला. पूर्ण वर्षभर जगभरातील सर्व देशांनी त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रमयोजनासुविधा यांचे नियोजन केले.  पर्यटनदिन साजरा करावयाचा  म्हणजे पर्यटन  सर्वांसाठी चांगले भविष्य या उद्देशाने  देशातही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो आहे.त्याप्रमाणे नगर मधील साईबन कृषी पर्यटन केंद्रात साजरा केला जातो अशी माहिती प्रकाश कांकरिया यांनी दिली. 

            

हिरवा निसर्गगर्द झाडीनिळशार समुद्र आणि मस्त भटकंतीहे शब्द कानावर पडले तरी आपल्यातील अनेक जण फिरण्याचे प्लॅनिंग करण्यास सुरुवात करतात. वर्षभरातून एकदा तरी माथेरानमहाबळेश्वरगोवा ते थेट लडाखपर्यंतचे एखादा प्लॅन हा ठरलेला असतो. तसा एका दिवसासाठीसाईबन ला जाण्याचे लोकांचे प्लॅन असतात 

                     

पर्यटन क्षेत्रात रोजगार निर्मितीची मोठी क्षमता आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने पर्यटन क्षेत्रात जागरुकता व्हावीपर्यटनाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पर्यटन क्षेत्राच्या जोरावर कोणत्याही देशातील आर्थिक स्थिती सुधारु शकते. नैसर्गिक सौदर्यसंस्कृती पाहण्यासाठी देशाच्या विविध भागांत लोकांनी जावं म्हणून पर्यटन विकास प्रकल्प महत्वाचे ठरतात. सिंगापूर सारख्या काही देशांची आर्थिक स्थिती ही फक्त पर्यटन क्षेत्रावर अवलंबून असते.

   


                  





जागतिक पर्यटन दिवसाची सुरुवात 1970 पासून संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेद्वारे केली गेली. 27 सप्टेंबर 1980 रोजी पहिला जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला. पर्यटनाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी आजच्या दिवशी जगभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. नवनवीन ठिकाणी भेट देणंस्थानिक गोष्टींची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देते.अहमदनगर जवळील पर्यटन स्थळी सोयी सुविधा उपलबध्द झाल्यात तर पर्यटक वाढू शकतील 

               

पर्यटनदिन साजरा करावयाचा  म्हणजे पर्यटन  सर्वांसाठी चांगले भविष्य या उद्देशाने  देशातही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो आहे. त्याप्रमाणे नगर मधेही मोठा रोजगार यामधून उपलब्ध होऊ शकतो असे मत मनपाच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य महेश कांबळे यांनी व्यक्त केले आहे शासन स्थरावर सरकार विविध पर्यटन स्थळांना विकास आराखडा मंजूर केला जातो. पर्यटन स्थळांना विकास करण्यासाठी सर्व सहकार्य केले जाते. शासन पर्यटन स्थळांना विकास आराखडा मंजूर करते. पर्यटन स्थळांचा जागतिक वारसा स्थळांत समावेश व्हावा म्हणून सरकार प्रयत्न करत असते.

                  

                          

सुंदर निसर्ग आणि हिरवाईने नटलेल्या डोंगररांगाखोल वाहणाऱ्या दऱ्याखळ खळत वाहणारी नदीनिळाशार समुद्रगजबजणारे सागर किनारे आणि अशा ठिकाणी भटकंती साठी मिळणारी संधी कोण सोडेलएक पर्यटन प्रेमी अशा मिळणाऱ्या सुवर्ण संधीचा नक्कीच सदुपयोग करून घेत असतो. पर्यटन क्षेत्र हे रोजगार निर्मिती करून देणारे क्षेत्र आहे. त्यामुळे जागतिक पर्यटन दिन साजरा करून देशातील पर्यटनाचा प्रचार आणि प्रसार व्हावा याचा प्रयत्न केला जातो. पर्यटन हे असे क्षेत्र आहे त्यामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्था सुधारू शकते. एखाद्या विशिष्ट ठिकाणी असणारे नैसर्गिक सौंदर्य आणि तेथील इतिहास जाणून घेण्यासाठी तेथील संस्कृती पाहण्यासाठी देशातील विविध भागातून पर्यटकांनी यावे हा पर्यटनाचा मुख्य हेतू . नगरमधील साईबनला राज्यातून पर्यटक येतात.. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या