Ticker

6/Breaking/ticker-posts

नगरच्या जिरायतीला वरदान ठरणाऱ्या साकळाईच्या सर्व्हेक्षणास मान्यता ; 2023 मध्ये कार्यवाही , खा.डॉ सुजय विखे यांची माहिती


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर-  डॉ सुजय विखे यांच्या लोकसभा निवडणुक प्रचारासाठी  १६ एप्रिल २०१९ ला वाळकी ता.नगर येथे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली होती. त्यावेळी साकळाई पाणी योजना पूर्ण करू ,असे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते. भाजपा - शिंदे सेनेचे सरकार येताच खा.डॉ सुजय विखे यांनी साकळाई प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला. त्यामुळे आज मुंबई येथे झालेल्या बैठकीत साकळाईच्या सर्व्हेक्षणास मान्यता देण्यात आली आहे.  

त्यामुळे श्रीगोंदा आणि विशेषत: नगर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. दरम्यान पूढील वर्षी साकळाईची कार्यवाहि सुरू होईल, अशी माहिती खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली .साकळाई पाणी योजना ही श्रीगोंदा, नगर तालुक्यातील जिरायत भागासाठी वरदान ठरणारी आहे. गेले 35 वर्षांपासून तिची मागणी होत आहे .प्रत्येक निवडणुकीत फक्त आश्वासने दिली जात होती, पण पाणी योजना मंजूर होत नव्हती. 


डॉ. सुजय विखे यांनी या कामी सुरुवातीपासूनच प्रामाणिक पणे प्रयत्न सुरू केले होते. मागील भाजपा- शिवसेना सरकार काळातही त्यांनी मुंबईत अनेक वेळा बैठका ही घेतल्या होत्या.आता पुन्हा भाजपाचे सरकार येताच खा. डॉ सुजय विखे यांनी पुन्हा जोरदार सक्रियता दाखवली उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांकडे पाठपुरावा सुरू केला. 


आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, खा.डॉ सुजय विखे,खा, सदाशिव लोखंडे, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले , जलसंपदा सचिव, सचिव लाभ क्षेत्र विकास, मुख्य अभियंता कुकडी आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक झाली.या बैठकीत साकलाई पाणी योजनेच्या सर्व्हेक्षणास मान्यता देण्यात आली. १५ ऑक्टोबर पर्यत या सर्व्हेक्षण निविदा अंतिम होणार असून. डिसेंबरअखेर सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात येऊन आराखडा सादर करण्याचा सूचना या बैठकीत जलसंपदा खात्याला देण्यात आल्या आहेत. 


डिसेंबर 2022 नंतर चौथ्या सुधारित प्रशासकीय आराखड्यात साकळाई  योजनेचा समावेश करण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.  पुढील  अर्थसंकल्पात त्यासाठी निधी मंजूर केला जाणार आहे. याबरोबरच डिंभे धरण ते माणिकडोहो अंतर्गत बोगद्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच कुकडी डावा कालव्याच्या प्रस्तावित मूळ क्षमतेने वाहता करण्यासाठी विशेष दुरुस्ती निधीसही मान्यता देण्यात आली आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी बचत होत येडगाव धरणातील पाणी साठा वाढून त्याचा फायदा मोठ्या क्षेत्राला मिळणार आहे.साकळाई मार्गी लागल्यामुळे नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातून आनंद व्यक्त केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या