Ticker

6/Breaking/ticker-posts

ऐन पावसाळ्यात नागरिकांना दिलासा; खरवंडी कासार - लोहामार्ग ते जगताप वस्ती रस्ता पूर्ण..!


खरवंडी कासार माजी उपसरपंच राजेद्र जगताप यांच्या पाठपुराव्याला यश

जि. प. सदस्या प्रभावती ढाकणे यांचे विशेष प्रयत्न

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

टाकळी मानुर -पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे जिल्हा परिषद सदस्या प्रभावती प्रतापराव ढाकणे यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा परिषद विकास निधीतुन खरवंडी कासार लोहा मार्ग ते जगताप वस्ती रस्ता साकारला आहे .


अनेक वर्षांपासून  हा रस्ता प्रलंबीत होता पावसाळ्यात पाई चालणे देखीलं अडचणीचे होते. खरवंडी कासार, काटेवाडी, ढगेवाडी ग्रामस्थांचा रहदारी चा हा मार्ग आहे. हा रस्ता करण्याकामी खरवंडी कासार माजी उपसरपंच राजेद्र जगताप यांनी जिल्हा परिषद सदस्या प्रभावती प्रतापराव ढाकणे यांच्या कडे ग्रामस्थांच्या रहदारी संदर्भांत अडचण सांगत रस्ता कामी लक्ष वेधले.


सदर  ग्रामस्थांची रहदारिची दखल घेत ढाकणे यांनी रस्ता काम मार्गी लावले जगताप वस्ती ते काटेवाडी ढगेवाडी या रस्त्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे सौ ढाकणे यांनी प्रतिनिधी बोलताना सांगीतले त्या म्हणाल्या की सर्वं सामान्यांचे जिवणमान उंचावले पाहीजे यातच आमचा आनंद आहे आणि तोच आमच्या पदाचा सन्मान आहे दळण वळण हा प्रगतीचा मार्ग आहे विकास ही निरंतर चालणारी प्रक्रीया आहे मात्र योग्य अडचणीच्या ठिकाणी ग्रामस्थांच्या समस्या सोडवणे हे माझे आद्य कर्तव्य आहे, हिच शिकवण माजी केंद्रिय मंत्री ढाकणे साहेबांनी आम्हास दिली आहे. सर्व सामान्याची सेवा करण्यातच खुप मोठे समाधान आहे. या कार्यांतुनच मोठी ऊर्जा मिळते. असे सौ. ढाकणे म्हणाल्या.


माझ्या गणातील वाडी वस्ती गावाला जोडली पाहीजेत हे माझे स्वप्न होते माझ्या पदाच्या माध्यमातून सर्व सामान्यांना न्याय मिळाला पाहीजे ते माझे स्वप्न साकारत आहे काम छोटे असो की मोठे असो मात्र काम पुर्णत्वाचा आणी सर्व सामान्यांची सेवा करण्यातच खुप  मोठे समाधान लागते असे मत सौ. ढाकणे यांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या