Ticker

6/Breaking/ticker-posts

नागरिकांनी आमिषाला बळी न पडता काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे रहावे- मनसे तालुका अध्यक्ष रांधवणे यांचे आवाहन

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

शेवगाव :-  नागरिकांनी अमिषाला बळी न पडता जनतेची कामे मार्गी  लावणा-याच्या पाठीशी उभे राहावे असे प्रतिपादन मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी केले.


 शेवगाव शहरातील तळणी रोड परिसरातील जगताप वस्ती येथील सिंगल फेज लाईटच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमा प्रंसगी माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शित्रे, केशव भुजबळ, राजेंद्र ईगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेवगाव नगरपरिषद हद्दीतील तळणीरोड येथील जगताप वस्ती येथे गेल्या अनेक वर्षापासून सिंगल फेज लाईट नसल्याने या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. परिसरातील नागरिकांनी हि बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांच्या निदर्शनास आणून दिली याची तातडीने दखल घेत मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी जिल्हाधिका-यांशी संपर्क करत हा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली तसेच याचा पाठपुरावा केला.

याबाबत जिल्हाधिका-यांनी देखील तातडीने दखल घेत या कामाला मंजूरी दिली. या कामाचा शुभारंभ आज जेष्ठ नागरिक विठ्ठल जगताप व माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शित्रे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. 

यावेळी मनसे तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे, गणेश डोमकावळे, राजेंद्र ईंगळे,केशव भुजबळ, डॉ. सोमनाथ आधाट, देविदास हुशार, सागर आधाट, ज्ञानेश्वर कुसळकर, सुरज ओहळ, आलिस मुकुटमल, स्वप्निल केळकर, पांडूरंग जगताप,बाळासाहेब जगताप, राजेंद्र जगताप, सुनिल काथवटे, मंगेश लोंढे, यांच्या सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या