Ticker

6/Breaking/ticker-posts

महावितरणकडून ३ मीटर रीडिंग एजन्सीज बडतर्फ तर ३ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीसा

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नाशिक : दि. १० जुलै २०२२  

नाशिक व जळगाव परिमंडलातील मीटर रिडींग एजन्सीजचे संचालक व व्यवस्थापकांच्या बैठकीत संचालक ताकसांडे बोलत होते. गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार सूचना देऊनही अचूक मीटर रीडिंगसाठी सुधारणा न करणाऱ्या तीन मीटर रीडिंग एजन्सीजना या बैठकीतच ताबडतोब बडतर्फ करण्यात आले तर संबंधित जबाबदार तीन कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. एजन्सीजच्या कामात सुधारणा होत नसेल तर मात्र कारवाई अटळ आहे.  महावितरणच्या जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध देखील कारवाई करण्यात येईलअसा इशारा महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी दिला आहे. 

वीजग्राहकांना उत्कृष्ट व दर्जेदार सेवा तसेच महसूलवाढीसह सक्षमतेचा, प्रगतीचा वेग वाढविण्यासाठी महावितरणकडून आमुलाग्र सुधारणा सुरु आहेत. प्रत्यक्ष वीजवापराप्रमाणे ग्राहकांना अचूक बिल देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. मीटर रीडिंगमध्ये अचूकता नसल्यास ग्राहकांना वीजबिल दुरुस्तीचा नाहक त्रास सहन करावा लागतो. सोबतच महावितरणच्या महसूलाचे देखील नुकसान होते. हे प्रकार टाळण्याची प्राथमिक जबाबदारी मीटर रीडिंग एजन्सीजवर आहे. वारंवार सूचना देऊनही रीडिंग एजन्सीजच्या कामात सुधारणा होत नसेल तर मात्र कारवाई अटळ आहे. तसेच महावितरणच्या जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध देखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी शुक्रवारी (दि. ८) एकलहरे येथे आयोजित आढावा बैठकीत दिला. 

 

 या आढावा बैठकीत संचालक संजय ताकसांडे यांनी मीटर रीडिंग एजन्सीजच्या संचालकांना अचूक बिलींगमधील त्यांची भूमिका व जबाबदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. संचालक (संचालन) संजय ताकसांडे म्हणाले की, मीटर रीडिंग हा बिलींगचा मुख्य आधार आहे. त्यात १०० टक्के अचूकता पाहिजेच. परंतु चुकीचे किंवा सदोष रीडिंग घेतल्यास महावितरणच्या महसूलाचे नुकसान आणि ग्राहकांना वीजबिल दुरुस्तीचा नाहक त्रास होतो ही बाब अजिबात खपवून घेतली जाणार नाही. मीटर रीडिंग एजन्सीजविरुद्ध केवळ कारवाई करणे हा मुख्य उद्देश नाही. परंतु रीडिंगसाठी जे अचूकतेचे, गुणवत्तेचे मापदंड आहेत त्यात कुचराई झाल्यास एजन्सीज व महावितरणच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल. अचूक मीटर रीडिंगबाबत उपविभाग व विभाग कार्यालयांनी दैनंदिन आढावा घ्यावा. दैनंदिन पर्यवेक्षण करावे. बिलिंग किंवा रीडिंगमध्ये कोणतीही अनियमितता आढळल्यास ताबडतोब उपाय करावेत व ग्राहकांना अचूक बिल देण्यात येईल याची काळजी घ्यावी. सोबतच मीटर रीडर नियुक्त करताना त्यांची शैक्षणिक पात्रता, तांत्रिक प्रशिक्षण, संवाद कौशल्य, गुणवत्ता इत्यादी बाबी संबंधित अधिकाऱ्यांनी एजन्सीजकडून तपासून घ्याव्यात असे निर्देश यावेळी संचालक ताकसांडे यांनी दिले. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या