Ticker

6/Breaking/ticker-posts

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव : नाशिक विभागातील 38 लाख 51 हजार घरांवर फडकणार तिरंगा

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


नाशिक-  भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असून
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नाशिक विभागात 13 ते 15ऑगस्ट 2022 या कालावधीत हर घर झेंडाउपक्रम राबविण्यात येणार आहे. नाशिक विभागातील शहरी व ग्रामीण भागातील घरांची एकूण संख्या 38 लाख 51हजार  651 इतकी असून या प्रत्येक  घरांवर तिरंगा फडकविण्यासाठी नियोजन करण्यात येऊन उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संबंधित यंत्रणांना केले आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने नागरिकांच्या मनामध्ये स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृति तैवत रहाव्यात, या लढ्यातील क्रांतिकारक तसेच अज्ञात नायकांच्या घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे. तसेच प्रखर देशभक्तीची भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव अंतर्गत हर घर झेंडाउपक्रम राबविण्यात येणार आहे.

नाशिक विभागातील नागरी भागात एकूण 10 लाख 62 हजार 578 घरे आहेत. नाशिक विभागातील ग्रामीण भागात एकूण 27 लाख 89 हजार 73 घरे आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने  पाचही जिल्ह्यांना एकूण 7 लाख 66 हजार 369 झेंडे पुरविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

नाशिक जिल्ह्यात 12 लाख 05 हजार 288 घरांवर फडकणार तिरंगा

नाशिक महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात 4 लाख 25 हजार 240 घरांची संख्या असून तितकेच झेंडे फडकविण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील घरांची संख्या 7 लाख 80 हजार 48 इतकी असून तितकेच झेंडे फडकविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर 9 लाख 5 हजार 288 झेंडे उपलब्ध होणार असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून 3 लाख झेंडे पुरविण्यात येणार आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात 08 लाख 99 हजार 666 घरांवर फडकणार तिरंगा

अहमदनगर महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात घरांची संख्या 1 लाख 96 हजार 905 असून ग्रामीण भागातील घरांची संख्या 7 लाख 02 हजार 761  इतकी असून तितकेच झेंडे फडकविण्यात
येणार आहे. जळगाव महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात घरांची संख्या 2 लाख 85 हजार 235  असून ग्रामीण भागातील घरांची संख्या 6 लाख 80 हजार 156 इतकी असून तितकेच झेंडे फडकविण्यातयेणार आहे.

 

धुळे महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात घरांची संख्या 1 लाख 8 हजार 914 असून ग्रामीण भागातील घरांची संख्या 2 लाख 93 हजार 205 इतकी आहे. नंदूरबार नगरपालिका क्षेत्रात घरांची संख्या 46 हजार 284 असून ग्रामीण भागातील घरांची संख्या 3 लाख 32 हजार 903 इतकी आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या