Ticker

6/Breaking/ticker-posts

भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी दिली कोरठण खंडोबा देवस्थानला स्वलिखित ज्ञानेश्वरी ग्रंथाची भेट

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नगर- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र भगवानगड (ता.पाथर्डी) महंत न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांनी नुकतीच श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानला ज्ञानेश्वरीवरील ३ ग्रंथाच्या प्रती देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग गायकवाड यांच्याकडे भेट म्हणून दिले

 

अध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग गायकवाड यानी सहकार्यांसह श्रीक्षेत्र भगवानगडाला भेट देऊन राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी महंत न्यायाचार्य  नामदेव महाराज शास्त्री यांचेही दर्शन व भेट घेतली. त्याप्रसंगी नामदेव महाराजांनी स्वतः लेखन केलेले ज्ञानेश्वरीवरील पराग परामर्श, अर्जुन एक चिंतन व ज्ञानेश्वरी विशेष चिंतन या तीन ग्रंथाच्या प्रती भेट स्वरूपात अध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग गायकवाड यांच्या हाती देवस्थानसाठी सुपूर्द केल्या आहेत.


यावेळी हरिभाऊ कराड व वसुदेव नामदेव गर्कळ तसेच जय मल्हार विद्यालय पिंपळगाव रोठाचे सहशिक्षक नामदेव जरांगे  व भिकाजी गर्कळ  उपस्थित होते. याप्रसंगी तीर्थक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या विविध विकास कामांची माहिती नामदेव महाराज शास्त्री यांनी जाणून घेतली. अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांनी त्याना भेटीचे निमंत्रण देऊन कोरठण देवस्थान जीर्णोद्धार, धार्मिक महत्व, उत्सव आदींबद्दलची माहिती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या