Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हयातील स्कूलबस चालकांनी वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करून घ्यावे-

 उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे आवाहनलोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर, दि.२४ :- अहमदनगर उप प्रादेशिक परिवहन  कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणा-या वाहनधारकांकडे वाहनाची वैध कागदपत्रे तसेच वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नसल्याचे दिसून येत आहे. तसेच कोवीड महामारीच्या कालावधीनंतर शाळा  प्रत्यक्ष सुरू झाल्या असल्याने रस्त्यावर विद्यार्थ्यांची ने-आण करण्याकरिता स्कूलबसचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. 


स्कूलबस धारकांना  वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करता यावी या उद्देशाने २५ जून २०२२, २ जुलै २०२२ आणि  ९ जुलै २०२२ रोजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, अहमदनगर येथे फक्त शालेय विद्यार्थ्यांची  वाहतूक करणा-या वाहन/ स्कूलबस साठी विशेष कोटा राखीव ठेवण्यात आला आहे.


जिल्हयातील सर्व स्कूलबस मालक व चालक यांनी आपल्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करून घ्यावे. त्याकरीता वरील दिनांकाची ऑनलाईन अॅपोइन्टमेन्ट घेऊनच आपले वाहन तपासणीकरिता कार्यालयात सादर करावे, असे आवाहन अहमदनगरचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे केले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या