Ticker

6/Breaking/ticker-posts

निवृत्ती महाराज दिंडीचे स्वागत; व्यापारी मित्र मंडळ च्या वतीने भोजन

 



 



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर- आज नगर मध्ये  आलेल्या त्र्यंबकेश्वर येथील निवृत्ती महाराज आषाडी वारीला पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीला मार्केट यार्ड व्यापारी मित्र मंडळ च्या वतीने भोजन देण्यात आलेगेली १३ वर्षे हा उपक्रम चालू आहे अशी माहिती अध्यक्ष अमोल पोखरणा यांनी दिली 


       मार्केटयार्ड मधील सर्व व्यापारी एकत्र येऊन वारकर्यांना फराळ साबुदाणा वडे, उपवास चिवडा,राजगिरा लाडू , दही चटणी चे भोजन देण्यात आले त्याचा लाभ सुमारे १२ ते १५ हजार वारकर्यांनी घेतला दुपारी १२ ते रात्री ७ वाजेपर्यत हे चालू होते ,  दिंडी मधील पालखीचे स्वागत करून पूजा  करण्यात आली 


 कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी किशोर पोखरणा ,संपत नाहाटा ,आनंद चोपडा,प्रवीण लोढा,राजू गांधी , अभय लुणिया,प्रीतम गांधी,व सर्व व्यपाऱ्यानी परिश्रम घेतले 



                           

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या