Ticker

6/Breaking/ticker-posts

ऐकावे ते नवलच..! संतापलेल्या वकिलाची कुत्र्यांविरोधात थेट कोर्टात याचिका !

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नगर:  भावकी-गावकीच्या वाद नवीन नाहीत, त्यातून मार्ग निघाला तर कोर्टाची पायरी चढावी लागते, हे सर्वपरीचीत आहेच, परंतु नगरमधील एका वकिलाने चक्क भटक्या कुत्र्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती हाती आली आहे. या वकिलाने कुत्र्यांविरोधात थेट न्यायालयाचे दार ठोठावल्याने जिल्ह्यात या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.

शहरातील हेरीटेज आणि लीना पार्क सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे आपल्या मुलभूत हक्कांवरच गदा येत असल्याचे म्हणत सोसायटीतील अ‍ॅड. सत्यजित कराळे पाटील यानी थेट औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

 याचिकेत दुचाकीचे सीट फाडणे, चारचाकी वाहनांवर चढून नुकसान करणे, सोसायटीत येणाऱ्या नागरिकांवर धावून जाणे, पार्किंगमध्ये खेळण्यासाठी जाणाऱ्या लहान मुलांवर हल्ला करणे, बाहेरील कचऱ्यातून खाद्यपदार्थ सोसायटीत आणणे असे उपद्रव या भटक्या कुत्र्यांकडून सुरू आहेत. याबाबत वारंवार अहमदनगर महापालिकेला लेखी तोंडी तक्रारी करूनही याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याच रहिवाशांचं म्हणणं आहे. याचा संदर्भ आहे. दरम्यान, औरंगाबाद खंडपीठात सत्यजित कराळे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे  न्यायालय नेमका काय निर्णय देणार, याकडे लक्ष लागल आहे.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या