Ticker

6/Breaking/ticker-posts

'भैरवनाथाचे ‘चांगभले' गर्जनाने दुमदुमली पाथर्डी

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 पाथर्डी :  शहराचे दैवत कालभैरवनाथ मंदिर येथे श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी देवी मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होऊन मूर्ती प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. भैरवनाथ व जोगेश्वरी देवीच्या मुर्तीची आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथातून सहवाद्य भव्यदिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी गुलाल व हळद उधळून दिलेल्या भैरवनाथांचे चांगभलं गर्जनाने परिसर दुमदुमला होता. मिरवणुकीमुळे शहरातील वातावरण चैतन्यमय झाले होते. 

  शहरातील बाजारतळ येथील खंडोबा मंदिर येथून आमदार मोनिका राजळे यांच्याहस्ते मुर्तीची विधिवत पूजा, आरती करुन मिरवणूकीला प्रारंभ करण्यात आला.घोड्यावर भैरवनाथांच्या पादुका,बँड पथक, भजनी मंडळ, आराधी, गोंधळी यांच्यासह आकर्षक फुलांच्या माळांनी सजावट करण्यात आलेल्या रथामध्ये सदर मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. बाजारतळ येथून निघालेली मिरवणूक शहरातून निघून कसबापेठेतील भैरवनाथ मंदिर येथे मिरवणूकीचे विसर्जन करण्यात आले. मिरवणुकीत मार्गावर सडा रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या, ठिकठिकाणी महिलांनी मूर्तीचे औक्षण केले तर भाविक भक्तांनी दर्शन घेतले.

 भैरवनाथ मंदिराचे पुजारी भाऊसाहेब मर्दाने, खंडोबा भक्त अशोक साठे यांच्या मार्गदर्शनाखाली  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, नगरसेवक महेश बोरुडे, रमेश गोरे, खरेदी विक्री संघाच्या संचालिका सिंधूताई साठे, मंगल कोकाटे, बंडू बोरुडे, रामनाथ बंग, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे,सविता भापकर, योगिता राजळेरत्नमाला उदमले, आरती निऱ्हा ळी, शिवसेनेच्या मंगल  म्हस्केसिताराम बोरुडे,योगेश रासने ,शंकर मर्दाने, देवा पवार, हुमायुन आतारअँड विजयकुमार वेलदे, बाबू बोरुडे आदी उपस्थित होते.

   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या