भाजपाच्या शहर जिल्हा आढावा बैठक संपन्न
भाजपाच्या शहर जिल्हा आढावा बैठकीत उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे यांचा सत्कार करतांना शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे. याप्रसंगी नगर शहरप्रभारी मनोज पांगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, तुषार पोटे, महेश नामदे, अजय चितळे, नगरसेवक रवी बारस्कर, मनोज कोतकर, प्रदीप परदेशी, गणेश नन्नवरे, प्रशांत मुथा, महेश तवले, शिवाजी दहिंडे आदि.
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर : भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्या सर्व आघाड्या व बुथ रचनांची माहिती घेऊन प्रलंबित निवडी लवकरच जाहीर करुन आगामी निवडणुकाच्या दृष्टीने बुथ रचना मजबूत करा. पार्टी विथ डिफरन्स म्हणून ओळखल्या जाणार्या भाजपामध्ये संघटनेत काम करणार्या व्यक्तीचा योग्य तो सन्मान पक्ष करत असतो. केंद्रात भाजपाचे ८ वर्षांपासून सरकार असून, विविध अभिनव योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहेत. त्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्याची जबबादारी सर्वांची असून, यामध्ये सातत्य ठेवले तर स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये आपण विजयी होऊ. यासाठी नवीन मतदार नोंदणीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष लक्ष देऊन या मतदारांची नोंदणी करुन घ्यावी. त्याचबरोबर पक्षाची ध्येयधोरणे जनसामान्यापर्यंत पोहचवावी, असे आवाहन उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे यांनी केले.
भाजपाच्या शहर जिल्हा आढावा बैठक उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे यांच्या उपस्थितीत झाली. याप्रसंगी नगर शहरप्रभारी मनोज पांगरकर, लक्ष्मण सावजी, शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, प्रा.भानुदास बेरड, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, संघटन सरचिटणीस तुषार पोटे, महेश नामदे, गिता गिल्डा, मंडलाध्यक्ष अजय चितळे, पंकज जहागिरदार, वसंत राठोड, बाळासाहेब गायकवाड, नगरसेवक रवी बारस्कर, मनोज कोतकर, प्रदीप परदेशी, गणेश नन्नवरे, प्रशांत मुथा, युवा मोर्चा अध्यक्ष महेश तवले, उपाध्यक्ष शिवाजी दहिंडे, नरेंद्र कुलकर्णी, संतोष गांधी, शहर विधानसभा अध्यक्ष शशांक कुलकर्णी, ज्ञानेश्वर काळे, निशांत दातीर, बाळासाहेब पाटोळे, सुधाकर भोसले, लिला अग्रवाल, कालिंदी केसकर, वंदना पंडित, शुभांगी साठे, कुसूम शेलार, सुमित बटुळे, साहिल शेख आदि उपस्थित होते.
यावेळी भैय्या गंधे म्हणाले, भाजपाचे नगरमध्ये चांगल्या पद्धतीने काम सुरु असून, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे मनपा पोट निवडणुकीत भाजपाचा उमेदवार विजयी झाला आहे, ही चांगली सुरुवात असून, कार्यकर्त्यांनी यापुढे आणखी जोमाने काम करावे. पक्षाच्यावतीने राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम शहरात राबवून पक्ष वाढीचे काम सुरु आहे. आता आगामी निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करुन कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असल्याचे सांगितले.
0 टिप्पण्या