Ticker

6/Breaking/ticker-posts

मढी देवस्थान समितीचे कार्य कौतुकास्पद : आमदार मोनिका राजळे

 मोनिकाताईंचा वाढदिवस साधेपनाने साजरा



क्षेत्र मढी येथे  आमदार मोनिका राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त कानिफनाथ देवस्थान समीतीच्या वतीने  सन्मान करताना देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड, कोषाध्यक्ष बबन मरकड, सचिव विमल मरकड आदी.

 

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 


मढी : .श्री क्षेत्र मढी येथे देवस्थान समितीच्या वतीने सुरु असलेले विविध विकास कामे व वर्षभरात विविध राबवले जाणारे सामाजिक  उपक्रम कौतुकास्पद आहेत .या सामाजिक उपक्रमामुळे देवस्थानने नावलौकिक मिळवला असून भविष्यातही विकास कामे झपाटयाने होऊन  शिर्डी व शनिशिंगणापूरच्या धर्तीवर मढी देवस्थान नावारूपाला यावे. विकास कामासाठी लागणारा निधी मिळवून देण्यासाठी शासन दरबारी  प्रयत्न करु, अशी ग्वाही आमदार मोनिका राजळे यांनी दिली .

 

श्री क्षेत्र मढी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती व आमदार मोनिका राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त कानिफनाथ देवस्थान समीतीच्या वतीने  सर्व रोगनिदान  आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . शेकडो नागरिकांची आरोग्य तपासणी या शिबिरात करण्यात आली .ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत नाहीत. या हेतूने  मढी देवस्थान समीतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. 


या शिबिरात औषधे वाटप, डायबीटीस तपासणीरक्त तपासणी , मेंदू ,हृदय रोग व दंत रोग  ,अस्थिरोग , नेत्ररोग  व इतर अनेक आजारांची रुग्णांची तपासणी करण्यात आली . रुग्णावर तज्ञ डॉक्टर कडून मोफत औषध उपचार करण्यात आले .रुग्णांच्या प्रवासासाठी पाथर्डी व तिसगाव येथून देवस्थान समितीच्या वतीने मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली .


 या शिबीरात डॉ . शैलेंद्र मरकड , डॉ . महेश बारगजे ,डॉ . सागर मरकड ,डॉ . प्रियंका मरकड ,भावनाताई बांगर , तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे ,केके बुधराणी  हॉस्पिटलचे डॉ बोरुडे ,डॉ . संदीप सुराणा ,जनकल्याण रक्तपेढीचे डॉ . विलास मढीकर  तसेच परिसरातील अनेक डॉक्टर मेडिकल स्टाफ मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी यांनी रुग्णांची तपासनी व औषधोपचार केले .


आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते रक्तदान शिबिरात सहभागी होणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले . यावेळी मढी देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड 'कोषाध्यक्ष बबन मरकड , सचिव विमलताई मरकड ,माजी विश्वस्त ज्योती मरकड ,विश्वस्त भाऊसाहेब मरकड , शामराव मरकड ,रवींद्र आरोळे , डॉ . विलास मढीकर माजी सरपंच देविदास मरकड ,बाबासाहेब मरकड ,नवनाथ मरकड ,भानुविलास मरकड ,भाग्येश मरकड बाळासाहेब मरकड ,नाथा मरकड ,सुरेश मरकड ,गोरक्ष मरकड , रवींद्र मरकड,मनोज मरकड , ग्रामसेवक विठ्ठल राजळे ,दत्तात्रय मरकड,एकनाथ मरकड ,शैलेंद्र बोंदार्डे शरद कुटे ,आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते 


.देवस्थानचे विश्वस्त  कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी ,अंगणवाडी सेविका आशा सेविका ,नाथ प्रतिष्ठान यांनी या शिबिरासाठी परिश्रम घेतले. 

 

( आरोग्य शिबिराचा समारोप झाल्यानंतर आमदार मोनिकाताई राजळे यांनी मढी येथे चिमुकल्या मुलांसोबत साधेपणात आपला वाढदिवस साजरा केला .मोनिकाताई यांनी चिमुकल्याना केक भरवला  . त्यांच्या वाढदिवसानिमित्त येथे अनेक मान्यवर व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभीष्टचिंतन केले.) 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या