Ticker

6/Breaking/ticker-posts

सदाअण्णांच्या पश्चात कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही - आमदार बबनराव पाचपुते

 

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 


काष्टी:
माझ्या चाळीस वर्षाच्या  राजकीय  जीवनात समाजकारणाबरोबर राजकारण करताना माझ्या मागे ढाली सारखा पाठीराखा म्हणून माझे धाकटे बंधू स्व.सदाअण्णा यांनी मला खंबिरपणे साथ दिली. सदाअण्णांना जावून एक वर्षे झाले. पण  झालेल्या   दुःखातून सावरने  कठिण आहे. तरिही ज्यांनी आमच्या कुटुंबाला घडविले. समाजात नेतृत्व करण्याची संधी दिली. त्या जेष्ठ - श्रेष्ठ कार्यकर्त्यांना अण्णांच्या मागे मी वाऱ्यावर सोडणार नाही. अशी ग्वाही आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली.

 

श्रीगोंदा तालुक्यातील  काष्टी येथे साईकृपा उद्योग समुहाचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य स्व.सदाशिवअण्णा पाचपुते यांचे प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ह.भ.प.रामराव महाराज ढोक (नागपूर ) याचे हरिकिर्तन झाले. त्यावेळी ह.भ.प.अविनाशमहाराज साळूंखे, नागवडे कारखाना उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, माजी आमदार राहुल जगताप, माजी आमदार रंजना कुल, राष्ट्रवादीचे प्रदेशउपाध्यक्ष घनश्याम शेलार, जिल्हा महिला बालकल्याणच्या सभापती अनुराधा नागवडे,  जयदत्त सुरेश धस यांच्यासह मान्यवरांनी स्व.सदाअण्णा यांच्या  आठवणीनां  उजाळा दिला.

 

यावेळी सर्वाचे   ऋण व्यक्त करताना ‌‌आमदार पाचपुते म्हणाले सदाअण्णांनी मागे खंभीरपणे जबाबदारी सांभाळून दररोज सामान्य जनतेची कामे करुण अहोरात्र कष्ट घेत प्रश्न सोडविण्याचे काम केले. अण्णांच्या मागे आता माझी जबाबदारी आहे.  म्हणूनच आपण आमच्या प्रेमापोटी मोठ्या संख्येने उपस्थित आहात याची मला जाणिव आहे. भविष्यकाळात माझ्यासह आमच्या कुटुंबातील सर्व मुल यामध्ये अण्णांचे  सुदर्शन व साजन हे दोघेही अण्णांचा वारसा पुढे चालवून समाजाच्या अडीअडचणीत तुमच्या मागे ढाली सारखे  उभे राहतील. याची मला खात्री आहे.

 

तालुक्यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आपण आलात आमचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला याबद्दल सर्वाचे ऋण व्यक्त करतो असे आमदार पाचपुते म्हणाले.

कार्यक्रमाला दीपकशेठ नागवडे,  केशवभाऊ मगर,  भगवानराव पाचपुते,  अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नहाटाबाळासाहेब गिरमकर,  कुंडलिकराव दरेकर,  राजेंद्र म्हस्के, टिळक भोस, जिजाबापु शिंदे,  लक्ष्मणराव नलगे,  रमेश गिरमकर,  उद्योजक ऋषिकेश शिंदे,  चेतनसिंह केदार सावंत, धैर्यशिल पाटील, उपजिल्हा अधिकारी  दत्तात्रय नवले,  वैभव चव्हाण, रोहिदास यादव  यांच्यासह मोठ्या संख्येने जनसमुदाय हजर होता. प्रास्तविक जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते यांनी तर साजन शुगरचे अध्यक्ष साजन पाचपुते यांनी सर्वाचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या