Ticker

6/Breaking/ticker-posts

ओव्हरलोड ठरतोय जीवघेणा.. ऊसाचा ट्रक पलटी

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

चिंचपुर -वडगांव  (ता.पाथर्डी) : गावामध्ये ऊस घेऊन जाणारा मालवाहतूक ट्रक काल दुपारी उलटला आहे. यामध्ये दैव बलवत्तर म्हणून कसलीही जिवितहानी झालेली नाही. 

 

वडगांव चिंचपुर पांगुळ रस्त्याच्या मजबुतीकरण खडीकरण, डांबरीकरण कामाचा सुमारे तीन चार महिन्यांपूर्वी उदघाटन कार्यक्रम झाला होता ,परंतु ठेकेदारांच्या हलगरजीमुळे काम सुरू झाले नव्हते. दरम्यान सदर काम मागील आठवड्यात  संथगतीने सुरू झाले आहे . त्यामुळे वाहनधारकाना मात्र या कामामुळे पिंपळनेर मार्गे अरुंद,अवघड ,कच्या रस्त्याने जीव मुठीत धरून वाहतूक करावी लागत आहे. 

 

 याच रस्त्यामुळे काल ट्रकचा अपघात झाला आहे. अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे . वडगांव  परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उसाची लागवड आहे . रोज अनेक उसाच्या ट्रॅक्टर ,ट्रक गाड्यांची वडगांव ,ढाकनवाडी,चिंचपुर गावातून ये जा सुरू असते. उसाने भरलेला ट्रक (क्रमांक. एम एच ०४ सी .यू. ८९९४ ) हा ट्रक वडगांव शिवारातून उस घेऊन ऊस गाळप कारखान्यावर निघाला असतांना वडगांव- पिंपळनेर रोडवर वळण घेतांना उलटला . या ट्रकमधील चालकाला व क्लिंनरला सुखरूप बाहेर काढण्यात आले. 

 

या अपघात सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही मात्र ट्रकचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे वेळीच काही मोठी दुर्घटना घडण्याआधी लवकरात लवकर वडगांव चिंचपुर मार्गाचे अतिक्रमण काढून डांबरीकरनाचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्त करत आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या