Ticker

6/Breaking/ticker-posts

काँग्रेस- राष्ट्रवादीत रंगली अशीही ग़ांधीगिरी..!

 
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नगर : काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्रासह धर्मवीर संभाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेया महापुरुषांवरील पुस्तके भेट दिली म्हणून पाठवित गांधीगिरी केली आहे. तर काळेंचे हे उपरोधीक पार्सल आमदार कार्यालयाने त्यानाच परत साभार पाठवून त्याची आम्हाला नाही, तर आपल्यालाच खरी गरज असल्याचे गांधीजींचा मौनमंत्र अंगीकारून दाखवुन दिले आहे. त्यामुळे  काँग्रेस- राष्ट्रवादीत चाललेली ग़ांधीगिरी  चांगलीच रंगली आहे.

काळे यानी कुरियरद्वारे ही भेट नुकतीच आमदारांच्या आयुर्वेद महाविद्यालयातील संपर्क कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवली होती. यामध्ये गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होता? इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे?, शिवछत्रपती - एक मागोवा या छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकांचा समावेश आहे. डॉ. जयसिंगराव पवार यांनी संपादित केलेल्या धर्मवीर संभाजी महाराजांवरील 'छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ' काँग्रेसने पाठविला.

महामानव, घटना शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः लिहिलेल्या 'माझी आत्मकथा' हे पुस्तक काँग्रेसने आमदारांना उपलब्ध करून दिले असून यामध्ये आंबेडकरांचे निवडक संपादित लेख आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेल्या 'शेतकऱ्याचा आसूड' त्याचबरोबर फुले यांचा अतिशय गाजलेला 'गुलामगिरी' हा ग्रंथ देखील काळे यांनी आमदारांना वाचनासाठी पाठविला. 

महापुरुषांवरील साहित्यरुपी भेट देत असताना काळे यांनी आमदारांना जाहीर आवाहन केले आहे की, आपण एक महिन्यासाठी दररोज दोन तासांचा वेळ मला द्यावा. मी काँग्रेसच्या व शहरातील सुसंस्कृत तरुण आणि जबाबदार नागरिकांच्यावतीने तुमचा अभ्यास वर्ग घेण्यासाठी रोज यायला तयार आहे. असे म्हटले होते, परंतु आमदार संग्राम जगताप यानी त्यावर कोनतेही प्रत्युत्तर न करता मौन बाळ्गल्याने ही त्यांची गांधीगिरीच असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान हे पार्सल कुरियरद्वारे आमदारांच्या आयुर्वेद महाविद्यालयातील संपर्क कार्यालयावर पोहोचले, मात्र ते कोणीही घेतले नाही, तर ते ज्यानी पाठवले त्यानाच खरी गरज असल्याचे सांगुन साभार परत केले, मात्र त्यावर कोणताही उपदेश न करता मौनातून प्रतीगांधीगिरीने प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे. एकूणच काँग्रेस- राष्ट्रवादीतील ही ग़ांधीगिरी चांगलीच रंगली आहे.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या