Ticker

6/Breaking/ticker-posts

श्रीगोंद्यात ट्रॉलीसह ट्रक्टर चोरीला ; तिघे गजाआड

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 


श्रीगोंदा:
शहरातून चोरी झालेला स्वराज कंपनीचा ट्रक्टर ट्रॉलीसह हस्तगत करण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले असून चोरी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे.
२१जानेवारी रोजी झुंबर कोथिंबीरे यांच्या मालकीचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरी झाला होता.याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सदर गुन्ह्याचा तपास चालु असताना श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस
निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली. चोरी केलेला ट्रॅक्टर कोपर्डी ता. कर्जत येथील तिघांनी चोरी केल्याची माहिती मिळाली.  त्यानुसार  गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना  सुचना देण्यात आली.सदरचा गुन्हा  अतुल
विश्वनाथ सुद्रिक वय २६, निलेश मच्छिंद्र सुद्रिक वय-२८, माउली बबन गवारे वय
१९ , सर्व रा.कोपर्डी ता.कर्जत यांनी केल्याबाबत खात्रीशिर माहीती मिळाली .

त्यावरुन गुन्हे प्रकटीकरण पथकाने वरील आरोपींना कोपर्डी येथुन ताब्यात घेतले व त्यांचेकडे गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
अधिक विश्वासात घेवुन विचारपुस केली असता गुन्हाची कबुली दिली. चोरी केलेला सहा लाख रुपये किंमतीचा स्वराज ट्रॅक्टर व ट्रॉली असे कोपर्डी कर्जत येथुन हस्तगत करण्यात आला आहे.


सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक गोकुळ इंगावले हे करीत आहेत.
ही कारवाई श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री रामराव ढिकले
,सपोनि दिलीप तेजनकर,सफो अंकुश ढवळे, पोना गोकुळ इंगवले, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ
किरण बोराडे,पोकॉ दादासाहेब टाके,पोकॉ अमोल कोतकर ,पोकॉ प्रशांत राठोड यांनी केली.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या