Ticker

6/Breaking/ticker-posts

तिनखडीत भरदिवसा घरफोडी ; चोरट्यानी सव्वा दोन लाख लांबविले

 

आमदार मोनिका राजळेंनी पोलिसांना अंदोलनाचा इशारा देवूनही चोरटे सुसाट..

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

पाथर्डी: तालुक्यातील तिनखडी येथे भरदिवसा घराचे कुलुप तोडुन दहा हजार रुपये रोख व सोन्याचांदीचे दागीने असा दोनलाख त्रेपन्न हजार ७५० रुपयाचा ऐवज चोरट्यांनी सोमवारी (ता .७ फेब्रुवारी) लांबविला.
भरदिवसा चोरुन नेला. पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ञाला बोलविले. मात्र रस्त्यापर्यंत मार्ग दाखविण्या पलिकडे पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. चो-यांचे सत्र थांबता थांबेना व पोलिसांना चोरांचा तपास लागेना अशीअवस्था झाली आहे. आमदार मोनिकाताई राजळेंनी पोलिसांना कार्यपद्धती सुधारा अन्यथा अंदोलनचा इशारा दिल्यानंतरही चोरीचे सत्र सुरुच आहे.


तिनखडी येथील उत्तम नानाजी खेडकर हे त्यांची पत्नी आणि मुलगा शेतातमधे कामासाठी
गेले होते. घराचे कुलुप लावले होते. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलुप तोडले घरातील पेटीतील दहा हजाराची रोख रकक्म व सोन्याचे दागीने असा २५३७५० रुपयाचा ऐवज चोरुन नेला. सायकांळी पाच वाजता मुलगा घरी आला असता त्याला घराचे दार उघडे दिसले. चोरट्यांनी कुलुप तोडलेले होते. आतमधे पाहीले तर पेटीतील दागीने पैसे गेले होते. पोलिसांना घटनेची माहीती दिली

 

सहाय्यक पोलिस  निरीक्षक ज्ञानेश्वर कांयदे , ईश्वर गर्जे, अनिल बडे, देवीदास तांदळे, राजु बडे यांनी घटानस्थळी धाव घेतली. श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना बोलविले. श्वानाने रस्त्यापर्यंत माग दाखविला. तेथुन चोरट्यांनी वाहनाचा वापर केला असावा . नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकारी व कर्मचा-यांनी यामधे लक्ष घालावे व हीटोळी पकडावी अशी मागणी तिनखडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या