Ticker

6/Breaking/ticker-posts

एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री ! शिवसैनिकांच्या या सुप्त भावना : प्रवीण दरेकर

 
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरात लागलेल्या बॅनर्समुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरु झाली आहे. या बॅनर्सवर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भाजपच्या नेत्यांकडूनही या मागणीला सुप्त पाठबळ लाभताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळणेही शिवसैनिकांची सुप्त इच्छा असल्याचे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले.

नेमकं काय घडतय?

९ फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असून त्या पार्श्वभूमीवर हे पोस्टर लावण्यात आले आहेत. ठाण्यातील वागळे इस्टेट भागात नगरविकास मंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर्स झळकले. या पोस्टरमध्ये शिंदेच्या चाहत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला आहे. वागळे इस्टेट लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष विजय यादव यांनी हे पोस्टर्स लावले आहेत. परंतु एकनाथ शिंदे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख अनेकांच्या नजरेत भरणार आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

मात्र, या बॅनर्समुळे राजकीय चाणक्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख खरंच मुख्यमंत्रीपदाचा पदभार एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवायचा विचार करत आहेत का, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहे. त्यामुळे आता महाविकासआघाडीत खरंच खांदेपालट होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील मातब्बर नेत्यांपैकी एक आहेत. राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु असताना शिवसेनेकडून एकनाथ शिंदे हेच नाव सगळ्यात हॉट फेव्हरिट मानले जात होते. परंतु, ऐनवेळी मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्याचा निर्णय झाला आणि एकनाथ शिंदे या स्पर्धेतून बाहेर पडले. मात्र, ठाण्यातील बॅनर्समुळे पुन्हा एकदा नवी चर्चा रंग्ली आहे. 

मी नुकताच नाशिकला जाऊन आलो. तिथून परतत असताना रस्त्यांवर एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देणारे अनेक बॅनर्स लागल्याचे दिसले. ते ठाणे जिल्ह्यासाठी व तेथील शिवसैनिकांसाठी सर्वेसर्वा आहेत. महाराष्ट्रातील शिवसैनिकांनाही त्यांचा आधार वाटतो. "एका शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री करेन" असे जेव्हा उद्धवजी ठाकरे म्हणाले होते त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरु होती.  त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजीतून पुन्हा एकदा शिवसैनिकांच्या त्या सुप्त भावना व्यक्त होताना दिसत आहेतअसेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या