Ticker

6/Breaking/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती मूर्तीचे लोकार्पण

 धर्मवीर संभाजीराजे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा नगरमध्ये उभारणार - आ.संग्राम जगताप

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर: नगर शहराच्या विकासाची पायाभरणी करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम आपल्या सर्व युवकांना करायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती मुर्तीचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र मध्ये ऐतिहासिक ठरला आहे.

 शहरांमध्ये धर्मवीर संभाजीराजेचां पुतळा बसविण्यासाठी पाठपुरावा करणार याच बरोबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रभरतील शिवप्रेमी मोठ्या संख्येने दाखल होऊन मोठ्या उत्साहात आज शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पूर्णाकृती मूर्तीचा लोकार्पण सोहळा पारंपारिक पद्धतीने संपन्न झाला लवकरच राज्य शासनाकडे पाठपुरावा करून छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्णाकृती मूर्तीची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती मूर्तीचा लोकार्पण सोहळा आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, अक्षय कर्डीले, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले तसेच शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

   

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या