लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
बेलवंडी: ता श्रीगोंदा- विनापरवाना वाळू चोरून वाहतूक सुरु असल्याची माहिती मिळ्ताच बेलवंडी पोलिसानी हालचाली करत हंगेवाडी शिवारात बेकायदा वाळू वाह्तूक करणारा हिरव्या रंगाचा ट्रक जप्त केला असुन चालकाला ताब्यात घेतले आहे. या ट्रकमध्ये ५ लाख १८ हजाराची वाळू निघाली. ही कारवाई रविवारी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी पथकासह केली.
सदर वाळु, (ट्रक नं MH - 14 बी . जे . 0935) मध्ये दौंड भिमा नदीपात्रातुन भरुन ती दौड़ काष्टी हंगेवाडी , चिंभळा, माठ,राजापुर मार्गे शिरुर येथे विना परवाना भरुन चालली होती. पोलिसानी ट्रकसह संतोष मारुती रासकर (वय 40 रा आण्णापुर ता . शिरुर) याला ताब्यात घेण्यात आले आहे . शासनाची परवानगी नसताना चोरून वाळू भरून तिची वाहतुक करताना वरिल मुद्देम मिळून आला चालक व मालक (सुहास लक्ष्मण शिंदे रा.ता.शिरुर जि पुणे) हा फरार असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पठारे हे करत आहेत .
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ,पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक दत्तात्रय कासार,पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पठारे,चालक पोलीस कॉन्स्टेबल विकास सोनवणे या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली
0 टिप्पण्या