Ticker

6/Breaking/ticker-posts

ऊसाच्या फडाला भीषण आग ; २ एकर ऊस जळून खाक !

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


नगर: कल्याण रोडवरील गाडळकर माळ्यातील गणेश गाडळकर यांच्या शेतातील ऊसाला रविवारी दि २० फेब्रुवारी रोजी अचानक आग लागून दोन एकर जळून खाक झाला.

आग एवढी भयानक होती की, अग्निशामक दलाला येईपर्यंत संपुर्ण शेताला वेढा पडला होता. आसपासच्या शेतकर्याना काय करावे ते सुचेना. आगीची माहीती मनपा अग्निशामक दलाला दिली गेली. बम्ब बोलावून घेण्यात आले होते. परंतु तोपर्यंत ऊसाच्या फ़डाला एका बाजुने आगीने वेगाने घेरले ,आग वेगाने पसरली होती.

घटनेची माहिती मिळ्ताच आग विजवण्यासाठी नगर मनपा अग्निशामक दल, एमआयडीसी अग्निशामक दल व व्हीआरडीई अग्निशामक दलाच्या गाड्या आल्या. त्यानी तत्काल पाण्याचा जोरदार मारा केला. त्यामुळे आग आटोक्यात आली. यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही मात्र  गाडळकर  यांचा दोन एकर ऊस जळून खाक झाला. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या