Ticker

6/Breaking/ticker-posts

खळबळजनक ! नोकरी लावून देण्याचे आमिष, विद्यार्थिनीची एक लाखात विक्री

 









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)



नागपूरः नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन विद्यार्थिनीची एक लाख रुपयांत गुजरातमध्ये विक्री करण्यात आल्याची धक्कादायक घटना एमआयडीसी भागात उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुजरातच्या दोन युवकांसह तिघांना अटक केली आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. विशाखा प्रदीप बिस्वास (वय ३५रा. एमआयडीसी)निखिल गिरीशभाई पटेल (वय ३५रा. मोठी चिचोलीअरवली गुजरात) व प्रकाश मेघाभाई वनकर (वय ३० रा. मेघरजजि. अरवली)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

पीडित १६ वर्षीय विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे. तिचे आईवडील एमआयडीसीतील एका कंपनीत काम करतात. विशाखा ही पीडित विद्यार्थिनीच्या मैत्रिणीला ओळखते. डिसेंबर महिन्यात विद्यार्थिनी विशाखाला भेटली. विशाखाने तिला गुजरातमध्ये कापडाच्या दुकानात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. ती विद्यार्थिनीला घेऊन गुजरातला गेली. निखिल याच्या माध्यमातून विशाखाने एक लाख रुपयांमध्ये प्रकाशला तिची विक्री केली. प्रकाशने मुलीशी लग्न केले.

दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्याने नातेवाइकांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर, महिला साहाय्यक पोलिस निरीक्षक शारदा भोपाळे, हेडकॉन्स्टेबल ओमप्रकाश, राजेश, विजय, रवींद्र जाधव व सचिन यांनी मुलीचा शोध सुरू केला. मुलगी विशाखाला भेटल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी विशाखाला अटक केली. त्यानंतर तिला घेऊन पोलिस गुजरातला गेले. मुलीची सुटका करून अन्य दोघांनाही अटक केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या