Ticker

6/Breaking/ticker-posts

नगर एलसीबीची धडाकेबाज कारवाई ! पारनेरला १ लाख ७० हजार रुपयांचा अवैध दारुसाठा जप्त

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

 

पारनेर : पारनेर तालुक्यात पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्यावर अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. अनिल कटके आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मोठी धडाकेबाज कारवाई केली यामध्ये पाच ठिकाणी छापा टाकत  1 लाख 70 हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल व देशी-विदेशी दारू जप्त केली

 मिळालेल्या माहितीनुसार आरोपी संभाजी विठ्ठल गव्हाणे राहणार असे ता पारनेर याच्याकडून 1 लाख 60 हजार किमतीची गावठी हातभट्टी तयार केलेली दारू तसेच रसायन आरोपी संतोष मधुकर साळवे वय 42 राहणार ढवळपुरी याच्याकडून 4 हजार रुपये किमतीची दारू आरोपी अनिल सिताराम विधाटे वय 21 राहणार वनकुटे ता पारनेर 4 हजार रुपये किमतीची दारू आरोपी पंडा रामभाऊ खंडवे व 30 राहणार पळशी व आरोपी दत्तात्रेय तिकोले राहणार वनकुटे यांच्याकडून  1150 रुपयाची दारू आरोपी नितीन मारुती साळवे वय 45  राहणार पळशी 1620 किमतीची दारू जप्त करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल १ लाख ७० हजार रुपयांचा अवैध दारुसाठा उध्वस्त करण्यात आला.

 स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. अनिल कटके यांच्या पथकातल्या पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस नाईक संदीप पवार, संतोष लोंढे, पो. काँ. जालिंदर माने, कमलेश पाथरुट, राहूल सोळुंके, सागर सुलाने आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला. दि. १ आणि २ आॅक्टोबरदरम्यान ही कारवाई करण्यात आली. यासंदर्भात पो. नि. कटके यांना अवैध दारुसाठ्याविषयीची माहिती मिळाली होती. या कारवाईत सहा गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये संतोष मधुकर साळवे, अनिल सिताराम विधाटे, पंडा रामभाऊ खांडवे, दत्तात्रय तिकोले, नितीन मारुती साळवे, संभाजी विठ्ठल गव्हाणे या गुन्हेगारांचा समावेश आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या