Ticker

6/Breaking/ticker-posts

कोपर्डीप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात आज सुनावनी सुरू

 

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर: राज्यभर गाजलेल्या व जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे घडलेल्या बालिकेवरील बलात्कार प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर यांनी या प्रकरणातील तीनही आरोपीना खून आणि बलात्कार या आरोपांसाठी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. सदर फाशीच्या शिक्षेच्या निश्‍चितीकरण्यासाठी राज्य सरकारने औरंगाबाद खंडपीठ येथे फाशी निश्चितीकरणाचा अर्ज विहित वेळेत दाखल केला होता. राज्य सरकारच्या अपिलाची सुनावणी आज दि ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे त्यामुळे याकडे राज्याचे लख लागले आहे.

 

 त्याचप्रमाणे, यातील आरोपी क्रमांक दोन संतोष भवाळ यांने फाशीच्या शिक्षेच्या विरोधात अपील दाखल औरंगाबाद खंडपीठात दाखल केले होते.त्यानंतर सदर प्रकरणाची औपचारिक सुनावणी औरंगाबाद खंडपीठ येथे होऊन यातील आरोपी क्रमांक दोन याच्या अपिलाच्या सुनावणीच्या दरम्यान त्याच्या अपिलाला झालेला विलंब माफ करून अपील दाखल करून घेण्यात घेण्यात आले होते.

 

 यातील एक आरोपी संतोष भवाळ याने मुंबई उच्च न्यायालय येथे स्वतंत्र याचिका दाखल करून सदर संपूर्ण प्रकरण औरंगाबादहुन मुंबईला वर्ग करण्यासंबंधी विनंती केली होती. औरंगाबाद येथे प्रलंबित असणारे आरोपी संतोष भवाळचे अपील त्याचप्रमाणे राज्य शासनाने दाखल केलेले फाशीच्या शिक्षेच्या निश्चितीकरणाचे अपील ही दोन्ही प्रकरणे मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्यात.

 

 यादरम्यान यातील आरोपी क्रमांक एक  जितेंद्र शिंदे आणि आरोपी क्रमांक तीन नितीन भैलुमे यांनीही मुंबई उच्च न्यायालयामध्ये फाशीच्या शिक्षेविरुद्ध अपील विलंबाने दाखल केली आहेत.या तिन्ही प्रकरणाची त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या अपिलाची सुनावणी आज दि. ४ रोजी न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर होणार आहे. त्यावर काय निर्णय होतो याकडे नजरा लागल्या आहेत

 

.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या