पाच
लाखांची देणगी घेऊन आमदार लंके यांनी केली भ्रष्टाचाऱ्यांची पाठराखण
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर
:नगर तालुका दूध
संघाच्या संचालक मंडळावर 8 कोटी 30 लाखांच्या आर्थिक अनियमिततेबाबत गुन्हे दाखल झाले आहेत.
तो गैरव्यवहार दडपण्यासाठी हे संचालक माजी आमदार कर्डीले यांना सोडून राष्ट्रवादी
मध्ये दाखल झाले आहेत. या संचालकांनी तालुका दूध
संघामार्फत 5 लाखांची देणगी भाळवणी कोविड सेंटरला दिली असून
त्याबदल्यात आमदार लंके यांनी भ्रष्टाचारी संचालकांची पाठराखण सुरू केली असल्याचा गंभीर आरोप दूध संघाच्या कर्मचारी संघटनेचे तायगा शिंदे आणि गजानन घोरपडे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
यावेळी तायगा शिंदे म्हणाले की नगर तालुका दूध संघ हा गैरव्यवहाराचा अड्डाच बनला
आहे.2005 ते 07
या कालावधीत तत्कालीन संचालक मंडळावर 2 कोटींचा
अपहार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा संघाच्या मालकीची जागा विकून नगर
तालुकायच्या वाट्याला 8 कोटी रुपये
आले होते.पण आर्थिक ताळेबंदात अनेक घोटाळे घातल्याचे चौकशी समिती च्या निदर्शनास
आल्या नंतर चौकशी अधिकारी एन डी गोधेकर यांनी मार्च 2021
मध्ये विद्यमान संचालक मंडळा विरोधात 8 कोटी 30
लाखांच्या आर्थिक अनियमिततेबाबत गुन्हे दाखल केलेले आहेत. पण राजकीय
पाठबळामूळे अद्यापही त्या संचालकाना अटक झालेली नाही.
विद्यमान
संचालक मंडळ यांनी एमआयडीसी इमारत दुरुस्ती च्या नावाखाली 25 ते 30 लाखांचा , मशनरी
दुरुस्ती च्या नावाखाली 5 लाखांच्या गैरव्यवहार केलेला आहे.
तसेच संचालक मंडळातील संचालाक यांनी ऍडव्हान्सच्या नावाखाली 23 लाख रुपये घेऊन अपहार केल्याचेही चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नगर तालुका दूध संघ हा गैरव्यवहार करण्याचा अड्डाच
बनला आहे.विद्यमान संचालक मंडळावर दाखल झालेले आर्थिक गैरव्यवहार विषयीची गुन्हे
दडपण्यासाठीच 9 संचालकांनी माजी आमदार कर्डीले
यांना सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केलेला आहे. तालुका दूध संघात आर्थिक घोटाळे होत असताना तालुका दूध संघाचे 273 कर्मचाऱ्यांना मात्र त्यांच्या हक्कांचे पैसे मिळालेले नाहीत.न्यायालयाने
वेळोवेळी देणी देण्याबाबत सूचना केल्या असतानाही संचालक मंडळाने त्याकडे दुर्लक्ष
केले आहे. असाही आरोप शिंदे व घोरपडे यांनी केला आहे.
0 टिप्पण्या