लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नेवासा
: शुक्रवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने ओढे नाले तुडूंब वाहू लागले असून
प्रशासनाच्यावतीने नागरिकांना सर्ततेचा इशारा देण्यात आला होता, तरीही तालुक्यातील खडका परिसरातील ३२ वर्षीय
विवाहित महिला नागझरी ओढ्यात कपडे
धुण्यासाठी गेली असता ती ओढ्याच्या पूराच्या पाण्यात वाहून गेली. शनिवार (दि.२) सकाळी ही घटना घडली आहे. १२
वर्षाच्या मुली देखत आई वाहून गेली. दरम्यान
शनिवारी दिवसभर व रात्री उशिरापर्यंत या महिलेचा शोध युद्धपातळीवर सुरू होता.
पंरतु रात्री उशिरापर्यंत शोध लागला नव्हता.
याबाबत
माहिती अशी की, खडका हद्दीतून जात असलेला
नागझरी ओढा आहे. या ओढ्यात शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास रोहिणी (रमा)
रमेश गगे वय (३२) ही महिला १२ वर्षाच्या आपल्या मुलीसह व घराजवळील कपडे धुण्यासाठी
ओढ्याकडे गेली असतांना ओढ्याच्या पाण्यात कपडे पडल्याने ते घेण्याचा प्रयत्न करीत
असतांना ती वाहून गेल्याची दुर्देवी घटना नागझिरी (खडका परिसरात) भागात घडली आहे.
या महिलेचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर शोध कार्य सुरु होते. सकाळी
१०:३० वाजता नागझरी ओढ्यात वाहून गेलेल्या महिलेचा रात्री उशिरापर्यंतही शोध लागला
नसल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
लहान मुली देखत आई वाहून गेली
शनिवारी सकाळी रमा व तिची १२ वर्षाची खूशाली मुलगी अशा दोघी मायलेकी
पावसाने जवळ असलेल्या ओढ्याला पाणी आल्याने कपडे धुण्यासाठी गेल्या
होत्या. पाण्यात काही कपडे पडले म्हणून ते घेण्याचा प्रयत्न होत असतांनाच ती
पाण्यात पडली व वाहू लागली. तेवढ्यात वाहत असतांना मुलीला घरी जावून आजोबांना
कल्पना देण्याची सुचनाही रमाने मोठ्या धाडसाने केली होती.
खडका
रस्त्यावरील वाहतूक बंद
शनिवारी
सकाळपासून खडका रस्त्यावरील वाहतूक बंद होती. नेवासा शहरानजीक असलेल्या काझी
नाल्याला पूर आल्याने खडकाफाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक दिवसभर बंद होती.
तसेच याच रस्त्यावरील घाडगे बंधाऱ्याजवळील ओढ्याला पूर आल्याने खडकाफाट्याकडून
वाहतूक बंद होती. या दोन्ही ओढ्यांना शनिवारी पूर आल्याने नागझिरी परिसरातील नागरिकांचे हाल झाले.
0 टिप्पण्या