Ticker

6/Breaking/ticker-posts

चुकीची माहिती दिली म्हणून फिर्यादीवरच गुन्हा दाखल

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

पाथर्डी : खेर्डे येथील खून प्रकरणातील फिर्याने  चुकीची माहिती दिली म्हणून पोलिसांकडून फिर्यादी शेषराव दत्तू जेधे यांचे विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ४ सप्टेंबर रोजी शेषराव जेधे  यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यामध्ये पुतण्या राजेंद्र रामकिसन जेधे याचा सांगवी रोड वरील त्याच्या घरासमोर चार आरोपींनी जुन्या भांडणाच्या वादातून चाकूने भोसकून खून केला असे म्हटले होते. त्यानुसार पाथर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी संबंधित घटनेची कसून चौकशी केली. त्यामध्ये पोलिसांनी गावातील अनेक लोकांचे जबाब नोंदवले.

 त्यामध्ये घटनेचे ठिकाण मयत राजेंद्र रामकिसन जेधे यांचे घरासमोर नसून गावातील बाबासाहेब वाघ यांच्या पडीक घरासमोर असल्याचे तसेच घटना बलखंडी बाबा यात्रेच्या छबिन्यात घडली असून मयत राजेंद्र यास चौघांनी नव्हे तर दोघांनी चाकूने भोकसुन मारल्याचे 14 लोकांनी जबाब नोंदवले. चार आरोपी पैकी दोघांनी मारल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी फिर्यादीने खोटी माहिती दिली म्हणून सरकार पक्षाच्या वतीने फिर्यादीवर गुन्हा दाखल केला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या