Ticker

6/Breaking/ticker-posts

येळी येथे स्टेट बॅकेची शाखा सुरू करावी; केंद्रीय अर्थराज्यमंत्री कराड यांच्याकडे मागणी

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

खरवंडी कासार :पाथर्डी तालुक्यातील येळी या ठिकाणी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाची नवीन शाखा मंजूर करावी अशी    मागणी अहमदनगर  भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा सचिव सचिन  पालवे यांनी अर्थ राज्यमंत्री खासदार डॉक्टर भागवत कराड यांची भेट घेऊन केली .


अहमदनगर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा सचिव सचिन  पालवे यांनी औरंगाबाद येथे केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या निवासस्थानी   भेट घेऊन    निवेदन दिले  लवकरच या ठिकाणी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया ची शाखा मंजूर करू असा शब्द केंद्रीय अर्थ राज्यमंत्री खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी दिला .


पाथर्डी तालुक्यातिल ग्रामीण भाग असणाऱ्या येळी येथे राष्ट्रीयकृत्त बॅक नसल्याने शेतकरी व  व्यापारी यांना मोठी अडचण निर्माण होत आहे पाथर्डी किवां खरवंडी कासार येथे जावे लागते तसेच खरवंडी कासार परिसरात फक्त सेंट्रल बॅकेची एकमेव शाखा असल्याने  प्रचंड गर्दी  असते  त्यामुळे या भागात येळी येथे  भारतीय स्ट्रेट बॅक इंडीया ची शाखा चालु करण्याची मागणी आहे याची माहीती पालवे यांनी दिली.

 पाथर्डी तालुक्यातील येळी या ठिकाणी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाची नवीन शाखा मंजूर करण्यासंदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री खासदार डॉक्टर भागवत कराड  यांना निवेदन दिले व लवकरच या ठिकाणी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया ची शाखा मंजूर करू असा शब्द केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड  यांनी दिला असल्याची माहिती पालवे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या