Ticker

6/Breaking/ticker-posts

विद्यार्थ्यांसाठी भालगाव -पाथर्डी बस सेवा सुरू करा. माजी सरपंच अंकुश कासुळे यांची मागणी

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


खरवंडी कासार : विद्यार्थी व ग्रामस्थाच्या सोईसाठी 

भालगाव ते पाथर्डी एसटी बस  सुरू करण्याची मागणी भालगावचे माजी सरपंच अंकुश कासुळे यांनी केली आहे.

महाराष्ट्र शासनाने शाळा सुरू केल्या आहेत शाळेत जाण्यासाठी दळणवळण व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी वाहनेही बंद आहे .थोडे जे चालु आहेत त्यामध्ये गर्दी व दाटी वटीने खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो  त्यामुळे  विद्यार्थ्यांच्या  आरोग्याच्या दुष्टीने योग्य नाही व त्यांचे भाडे ही पालकाला  परवडत नसल्यामुळे  आपल्या मुलाला शाळेत कसे पाठवायचे हा प्रश्न पालकांपुढे पडला आहे. पाथर्डी तालुक्यात शिक्षणासाठी पाथडी पूर्व भागातील अनेक विद्यार्थी आहेत . 

शाळेत जाण्यासाठी शाळेच्या वेळेवर बस नसल्यामुळे विद्यार्थ्यांपुढे अडचणी निर्माण झाले आहेत खरवंडी कासार येथील भालगाव या गावांमध्ये सकाळी ६ वाजता भालगाव येथुन जाणारी बस व तीच बस सायंकाळी मुक्कामी ब्रम्हनाथ येळम येत होती ति बंद आहे त्या बसने  विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी सोय होत होती  ती आता बंद आहे त्यामुळे ती बस पुन्हा सुरू करावी असे मागणी  भालगाव चे माजी सरपंच अंकुश कासुळे यांनी केले आहे .

बसआभावी विद्यार्थ्यांचे नुकसान

 शाळेच्या वेळेवर एसटी बस सुरू नसल्यामुळे काही विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही, त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे एसटी महामंडळाने बस सेवा सुरू केली तर हे विद्यार्थी शाळेत पोहोचतील त्यामुळे लवकरच बस सेवा सुरू करावी

-विनायक किर्तने , शिक्षक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या