Ticker

6/Breaking/ticker-posts

पुण्याच्या रुग्णालयात नगरचे ४० टक्के रुग्ण; अजित पवारांनी दिल्या 'या' सूचना

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

पुणेः राज्यातील करोना परिस्थीती आटोक्यात येत असताना अहमदनगर जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या मात्र चिंताजनक आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर जिल्ह्यात संगमनेर, पारनेरमध्ये रुग्णसंख्या वाढतेय. तिथे कठोर निर्बंध लागू करा आणि करोना संसर्ग रोखा अशा महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.


आज अजित पवारांनी पुण्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. तसंच पुण्यातील लसीकरणाबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे.

पुण्यातील ससून रुग्णालयात सर्वाधिक रूग्ण नगरचे आहेत. नगरचे जवळपास ४० टक्के रुग्ण आहेत. यात संगमनेर आणि पारनेर या दोन तालुक्यांतील सर्वाधिक रूग्ण आहेत. याबाबत नाशिक आणि नगर येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यावेळी रूग्णांवर उपचार करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत. अधिकाऱ्यांना चाचण्यांसाठी मदत हवी होती. नगर जिल्ह्यात संगमनेर, पारनेरमध्ये रुग्णसंख्या वाढतेय. तिथे कठोर निर्बंध लागू करा आणि करोना संसर्ग रोखा. असंही सांगण्यात आलं आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.

पुण्यात ७५ तास लसीकरण

पुणे शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सलग ३ दिवस आणि पुढे तीन तास असे ७५ तास लसीकरण केले जाणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे. तसंच, ग्रामीण भागात ही लसीकरण मोहिम सहा तालुक्यात घेण्यात येणार आहे. तर, पुणे शहरातील काही भागात लसीकरण होणार आहे, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.


ग्रामीण भागात प्रत्येक तालुक्यात एक कोविड आणि इतर नॉन कोविड रुग्णालयं सुरू करावीत असं सांगितलं आहे. शाळांमधून कोविडबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून मुलं त्यासंदर्भातली काळजी घेतील, असं सांगतानाच शाळा ४ तारखेपासून सुरू होणार असून अजून पालक हे पाल्यांना शाळेत पाठवण्याच्या तयारीत नाहीत. त्यांची मानसिकता दिवाळीनंतर पाठवण्याची आहे, असंही पवार यांनी म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या