Ticker

6/Breaking/ticker-posts

'आधी, POK खाली करा', आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचं पाक पंतप्रधानांना खणखणीत प्रत्यूत्तर

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नवी दिल्ली : भारताचं अविभाज्य अंग असलेल्या जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आल्यापासून पाकिस्तानचा जळफळाट वाढला आहे. त्यामुळेच, वारंवार आंतरराष्ट्रीय मंचावरून पाकिस्तानकडून काश्मीरचा राग आळवला जातो. संयुक्त राष्ट्र महासभेच्या वार्षिक अधिवेशनातही पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. यावर भारतानं संयुक्त राष्ट्रात उत्तर देण्याच्या आपल्या अधिकाराचा वापर करत इमरान खान यांच्या बेताल आरोपांना सडेतोड प्रत्यूत्तर दिलंय. इतकंच नाही तर, 'अगोदर पाकव्याप्त काश्मीर खाली करा' असा सज्जड इशाराही भारतानं यावेळी पाकिस्तानला दिलाय.

संयक्त राष्ट्रात भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत आंतरराष्ट्रीय मंचावरून पाकिस्तानला आरसा दाखवत खडे बोल सुनावलेत.

' हे सगळ्या जगाला माहीत आहे की पाकिस्तानकडून उघडपणे दहशतवाद्यांचं समर्थन केलं जातं. तसंच त्यांना हत्यारं पुरवली जातात. पाकिस्तानच्या नेत्यांकडून यूएनच्या आंतरराष्ट्रीय मंचाचा दुरुपयोग खोटे आरोप आणि दुष्प्रचारासाठी केला जाणं हे काही पहिल्यांदाच घडलेलं नाही. ही गोष्ट अत्यंत खेदजनक आहे. जगाचं लक्ष आपल्या देशाच्या खराब परिस्थितीवरून हटवण्यासाठी पाकिस्तानकडून अशा मार्गांचा वापर केला जातो. पाकिस्तानात दहशतवादी बेछूटपणे वावरतात मात्र सामान्य नागरिक खासकरून अल्पसंख्यांकांची परिस्थिती बिकट आहे', असं स्नेहा दुबे यांनी आंतरराष्ट्रीय मंचावरून म्हटलंय.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या