Ticker

6/Breaking/ticker-posts

हेलिकॉप्टर विकणे आहे...! महापालिकेनं मागवल्या निविदा

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबई : मालमत्ता कर थकवणाऱ्या एका एअरलाइन्स कंपनीच्या दोन हेलिकॉप्टरचा लिलाव करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या हेलिकॉप्टरचे बाजारमूल्य ठरवण्यासाठी मूल्यांकन तज्ज्ञांची नेमणूक करण्यासाठी पालिकेने शनिवारी निविदा मागवल्या आहेत.

 कर थकवणाऱ्या मालमत्ता आणि वस्तूंची अटकावणी तसेच जप्ती व नंतर लिलाव करण्याची कारवाई पालिकेमार्फत केली जाते. एका एअरलाइन्स कंपनीने तब्बल एक कोटी ९५ लाख रुपयांचा मालमत्ता कर थकवला आहे. यापूर्वी या कंपनीची जल व वीजजोडणी खंडित करण्यात आली होती. पालिका प्रशासनाने गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांचे हेलिकॉप्टर जप्त केले होते. या हेलिकॉप्टरचा लिलाव करण्यात येणार आहे.

दोन हेलिकॉप्टरच्या मूल्यांकनासाठी पालिकेने तज्ज्ञांची नेमणूक करायचे ठरवले असून त्यासाठी सुमारे ७ लाख ८ हजार रुपये मानधन अंदाजित केले आहे. संबंधित कंपनीने किती थकबाकी भरली, किती शिल्लक आहे, याची माहिती घेण्यासाठी पालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांच्याशी वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद मिळाला नाही.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या