लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
खरवंडी कासार :
पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागातील खरवंडी कासार
भालगाव ,टाकळी मानुर परिसरात सलग दोन-तीन दिवस परती चा जोरदार पाऊस झाल्याने शेतामधील कपाशी बाजरी पिकामध्ये पाणी साचले आहे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असुण पिकाचे पचंनामे करावेत व तात्तकाळ पिक विमा मजुंर करावा अशी मागणी ढाकणवाडीच्या सरपंच सौ सुरेखा ढाकणे यांनी केली आहे
पाथर्डीच्या पूर्व भागात चालु वर्षी मानसुन पुर्व पाऊसाने हजेरी लावल्या मुळे जुण महीण्यात पेरणी झाली मुग नक्षत्रात पेरणी झाली पण पावसाने ताण दिला होता तर आता जोरदार पणे परतीच्या पाऊसा हजेरी लावल्यामुळे ओल्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे कपाशी त पाणी साचल्याने कापसाच्या दोडया सडायंला लागल्या आहेत तर पाणी लागुण पिके उनमळु लागले आहे हातातोंडाशी आलेला घास हिरवण्याची शक्यता निर्माण झाली आहे
पूर्व भागात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून नदी नाले तलाव ओहर फ्लो झाले आहेत परतीच्या पावसाने जोर धरल्याने कपाशी तूर पिके पिवळी पडू लागली आहेत तर कपाशीचे बोंड सडु लागले बाजऱ्या पिवळ्या पडल्या असून दोन-तीन दिवसाच्या पावसाने नदी-नाले ओसांडून वाहत आहेत कपाशी तूर मका भुईमूग पिकाचे मोठे नुकसान झाले असून भाजीपाला सडु लागला असुण कोथिंबीर मेथी पालक भाजीचे मोठे नुकसान होत आहे जोरदार पडलेल्या पावसाने प्रचंड नुकसानी बरोबरच वाडी वस्ती वर जाणाऱ्या रस्त्याची पुरती वाट लागली आहे शेतकरी मेटकुळी आला असुण शेतकऱ्याना पिक विमा मिळणे गरजे आहे.
0 टिप्पण्या