Ticker

6/Breaking/ticker-posts

गणपती विसर्जना नतंर श्रीक्षेत्र भगवानगड व ३५ गावाच्या नळ पाणी पुरवठा योजने संदर्भात बैठक

  

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

खरवंडी कासार :श्री क्षेत्र भगवानगड व ३५ गावे व त्याखालील वाड्यावस्त्या साठी महत्वाची असणारी प्रस्तावित  नळपाणी पुरवठा योजने संदर्भात लवकर बैठक घ्यावी आशि विनंती अहमदनगर चे पालकमंत्री हसण मुश्रीफ यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना केली आहे 

      श्रीक्षेत्र भगवानगड व परीसरातील ३५ गावं  यांना जायकवाडी धरणातुन पिण्यासाठी  पाणी मिळण्यासाठी या प्रस्तावित नळ पाणी   पुरवठा योजनेला गती मिळावी म्हणून  मंत्रालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा भगवानगड परिसर नळ पाणी पुरवठा योजना संघर्ष कृती समिती  अध्यक्ष श्री. संजय  बडे यांनी दिला होता  त्याअनुषंगाने अहमदनगरचे  पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील  यांना लेखी पत्र देऊन या योजनेला गती देण्यासाठी बैठक आयोजित करण्याची विनंती केली आहे तसेच सजंय बडे  यांना लेखी पत्र पाठऊन  फोनवरून चर्चा करून गणपती विसर्जनाच्या नंतर पाणी पुरवठा मंत्री  गुलाबराव पाटील   यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईला बैठक घेऊ असे आश्वासन दिले आहे .

         पाथर्डी तालुक्यातिल  भगवानगड व परिसरातील ३५ गांवे व त्या खालील वाड्यांकरीता  जायकवाडी जलाशया मधुन  नळ पाणीपुरवठा योजना व्हावी अशी मागणी गेल्या आठ वर्षापासुन  होत आहेत 

 संघर्ष कृती समितीच्या वतीने शासन दरबारी गेल्या आठ वर्षापासून मागणी व वेळो वेळी पाठपुरावा केला जात आहे     पाथर्डी येथे  दि. १४/८/२०२१ रोजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी  आढावा बैठक घेतली होती त्या बैठकी मध्ये त्यांना निवेदन देवून  लक्ष वेधले होते. या मागणी बाबत  तालुक्यातिल सर्वच लोकप्रतिनिधींनी या योजनेबाबतची आवश्यकता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या  निदर्शनास आणून दिली होती . तेव्हा पालकमंत्री यांनी   भाषनात योजनेची सत्यता जाणून घेवून पुढील कार्यवाहीसाठी  पाणीपुरवठा व स्वच्छता   मंत्रालय मुंबई येथे ८ दिवसात बैठक आयोजीत करणेबाबत व योजनेला गती देणेबाबत आश्वासीत केले होते. मात्र  बैठक होवून पंधरा दिवस झाले  असतांना देखील याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. तसेच जनतेच्या भावनेचा व लोकप्रतिनिधीच्या मागणीची दखत घेवून याबाबत विहीत मुदतीत दिलेल्या आश्वासनाप्रमाने बैठक आयोजीत करणे या संघर्ष कृती समितीला अपेक्षीत होते. मात्र  कार्यवाही होत असतांना दिसतले नाही. त्यामुळे तातडीने याबाबत पाठपुरावा करुन  पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री  यांचेकडे बैठक आयोजीत करावी व योजना मार्गी लावावी. अन्यथा  याबाबत सोमवार दि. १३/९/२०२१ रोजी सकाळी ११ वाजता मंत्रालयाच्या गेटवर संघर्ष कुती समिती उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता   

मत्रांलया समोरील उपोषण सध्या स्थगीत- सजंय बडे 

 भगवानगड परिसरासाठी प्रस्तावित ३५ गावांच्या पाणीयोजनेला चालना मिळावी यासाठी गेली ८ वर्ष पाठपुरावा करत आहोत .भगवानगडावरून पैठण धरणाचे पाणी दिसते परंतु याच परिसरातील ३५ गावामध्ये उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्चून टॅकरवर विसंबून रहावे लागते,बारमाही असणारी दुष्काळी परीस्थिती बदलण्यासाठी या परिसरात पिण्यासाठी  पैठण धरणातुन पाणी यावे म्हणून  २०१४ साली मा.ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची भेट घेवून पाणी योजना प्रस्ताव बनवून सर्व्हेक्षण व आराखडा बनवला  परंतु पुढे सत्ताबदल होताच पाणीयोजना मागे पडली   परिसरावर अन्याय झाला. 

आता जिल्हा चे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गणपती म्होत्सवानतंर  लवकरच बैठक घेऊन प्रस्तावित योजनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासण दिल्याने मत्रांलया समोरील उपोषण सध्या स्थगीत केले आहे.  

:  सजंय बडे अध्यक्ष 

भगवानगड परिसर नळ पाणी पुरवठा योजना संघर्ष कृती समिती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या