Ticker

6/Breaking/ticker-posts

उद्या मंगळवारी 'ऑनलाईन' पध्दतीने होणाऱ्या 'नागवडे' कारखान्याच्या वार्षिक सभेकडे लक्ष

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

श्रीगोंदा:  'नागवडे' सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या मंगळवारी (दि.२८)दु.२ वा. कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. अशी माहीती कारखान्याचे उपाध्यक्ष युवराज चितळकर यांनी दिली. दरम्यान ही वार्षिक सभा निवडणुकीपूर्वीची शेवटची असल्याने सभासदांचे या सभेकडे लक्ष लागले आहे.

यासंदर्भात माहीती देताना ते म्हणाले की, 'नागवडे' कारखान्याची सन-२०२१ या आर्थिक वर्षाची ५६वी अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे यांचे अध्यक्षतेखाली उद्या मंगळवारी (दि.२८) दु.२ वा.व्हिडीओ काॅन्फरन्सिंग पध्दतीने ऑनलाईन पार पडणार आहे. सभेच्या विषय पत्रिकेवर एकुण नऊ विषय आहेत. यामध्ये मागील अधिमंडळ सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे,संचालक मंडळाने सादर केलेला सन-२०२०-२०२१ चा अहवाल स्विकारणे,अंदाजपत्रकापेक्षा कमी-जास्त झालेल्या खर्चास मान्यता देणे,वैधानिक लेखापरिक्षक, कर सल्लागारांची नेमणूक करणे,सन-२०२१-२१२२ या आर्थिक वर्षाच्या महसुली व भांडवली खर्चाच्या अंदाजपत्रकास मंजूरी देणे , वार्षिक सभेस अनुपस्थित असलेल्या व्यक्ति व संस्था सभासदांची अनुपस्थिती क्षमापिक करणे या महत्वाच्या विषयांचा समावेश आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानूसार कारखान्याची अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोनासंबंधी नियमांचे पालन करुन पार पाडली जाणार आहे. सभासदांनी या व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे होणा-या सभेत https://www.vcnowevents.in/SMSNNSSK55/ या लिंकवरुन ऑनलाईन पध्दतीने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन उपाध्यक्ष युवराज चितळकर,कार्यकारी संचालक रमाकांत नाईक व संचालक मंडळाने केले आहे. कारखान्याची निवडणूक लवकरच होणार आहे. तत्पुर्विच विरोधकानी आरोपांचा धुराळा उडवुन दिला आहे. निवडणूकीपूर्वीची ही शेवटची वार्षिक सर्वसाधारण असल्याने या ती गाजण्याची चिन्हे असून सभासदांचे या सभेकडे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या