Ticker

6/Breaking/ticker-posts

मनपाच्या नूतन पदाधिकार्यां्नी समन्वय ठेवून नगर विकासात योगदान द्यावे - पोपटराव पवार

 





लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नगर : राज्यात आघाडीचे सरकार आहे, त्याचप्रमाणे नगरच्या महानगरपालिकेतही आघाडीचे सरकार असल्याने राज्य सरकारकडून मोठा निधी प्राप्त होण्यास काहीही अडचण असणार नाही. त्यामुळे या निधीतून नगर शहरात मोठ-मोठ्या योजना राबविल्या जावू शकतात. त्यासाठी नूतन पदाधिकार्‍यांनी आपआपसात समन्वय ठेवून नगर विकासात योगदान द्यावे. आता मिळालेल्या पदाच्या माध्यमातून त्यांनी नगर शहरासाठी चांगले काम करावे. हे शहर आपले आहे, त्याचा विकासही आपणास करावयाचा आहे. आपण केलेले कार्य चिरंतन राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मिळालेली संधी ही फार मोठी आहे, या संधीचा उपयोग करुन शहरात मोठे काम उभे करावे. असे आवाहन पद्मश्री पोपटराव पवार यांनी  केले.

 नगरसेवक गणेश कवडे यांच्यावतीने नूतन महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, सभापती सौ.पुष्पा बोरुडे, उपसभापती मीना चोपडा, आशा बडे यांचा सत्कार पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी महापौर सुरेखा कदम, ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, संभाजी कदम, संजय शेंडगे, भाऊ बोरुडे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, संजय चोपडा, संतोष गेनप्पा, पुनम कवडे आदि उपस्थित होते.

 याप्रसंगी महापौर सौ.रोहिणी शेंडगे म्हणाल्या, शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी सर्वच पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे नूतन पदाधिकारी हे आपल्या कार्यकर्तुत्वाने शहराच्या विकासात योगदान देतील असा विश्वास आहे. मागील पदाधिकार्‍यांनी नगर शहरासाठी अमृत योजना, फेज-2 सारख्या मोठ्या योजना आणून शहराच्या विकासात हातभार लावला आहे. आता या योजना पूर्ण करुन नागरिकांच्या सेवेत रुजू करण्याचे काम आम्ही करुच. त्याचबरोबर राज्य सरकारकडून अशा प्रकारे मोठा निधी आणून शहराच्या विकास साधू, असा विश्वास व्यक्त केला.

 उपमहापौर गणेश भोसले म्हणाले, प्रभाग असो किंवा शहरात विकास कामे करण्यासाठी मोठा वाव आहे. फक्त इच्छा शक्तीची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे शहरातील मोठ्या प्रकल्पांसाठीही कंपन्या योगदान देतील, त्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे सांगितले. याप्रसंगी गणेश कवडे म्हणाले, मनपाच्या माध्यमातून सर्वच नगरसेवक व पदाधिकारी हे शहराच्या विकासात आपआपल्यापरी योगदान देत आहेत. पक्षभेद विसरुन शहरात चांगली कामे निर्माण झाली पाहिजे, यासाठी समन्वयातून चांगले कामे करण्याचा मानस आहे. या सत्कारानिमित्त विकासाची नांदी शहरात सुरु होईल, अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमास संजय शेळके, कैलास कवडे, रघुनाथ लांडे, अनिल कवडे, बाळासाहेब शेळके, राहुल लांडे, बापू शेळके, अभि शेळके, ओंकार कवडे, अदित्य कवडे, गणेश लांडे आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या