Ticker

6/Breaking/ticker-posts

आगामी सर्व निवडणूका शेवगाव मनसे संपूर्ण ताकदीने लढविणार- रांधवणे

गाव तिथं मनसेची शाखा; तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांचा निर्धारलोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


शेवगाव- शेवगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी सर्व निवडणूका संपूर्ण ताकदीने लढणार असुन गाव तिथं शाखा स्थापन करणार असल्याचे मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांनी सांगितले.   

शेवगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्वपूर्ण बैठक आज शासकिय विश्रामगृह येथे पार पडली.बैठकीदरम्यान नविन शाखा उदघाटन,विविध सामाजिक प्रश्नावंर आंदोलन,विविध सामाजिक उपक्रम, निवडणूका,पक्षाअंतर्गत नेमणूका, जिल्हापरिषद गट निहाय बैठका याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकिच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभागाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष ईंजि.श्री.विनोद काकडे हे होते. मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष गोकुल भागवत, मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे,उपतालुका अध्यक्ष संजय वणवे,यांनी उपस्थित महाराष्ट्र सैनिकांना मार्गदर्शन केले. 

यावेळी  बोलताना रांधवणे म्हनाले ग्रामीण भागात गांव तिथं शाखा तसेच शेवगाव शहरात देखील प्रभाग निहाय शाखा स्थापन करणार असल्याचे सागितले, लवकरच पक्षाचे नेते प्रकाश महाजन, दिलीप धोत्रे,पुणे येथील नगरसेवक वंसत तात्या मोरे, रूपालीताई ठोबंरे यांच्या हस्ते या शाखाचे उद्घाटने पार पडणार आहेत. यावेळी मनसेच्या तालुका उपाध्यक्षपदी देविदास हुशार, रामेश्वर बलिया यांची तर शहर प्रचार व प्रसिद्धि प्रमुख पदी ज्ञानेश्वर कुसळकर यांची नियुक्ति करण्यात आली. तर महाराष्ट्र नवनिर्माण रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभागाच्या तालुका अध्यक्षपदी सागर आधाट यांची नियुक्ति करण्यात आली. 

 याप्रसंगी अनेक महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.यावेळी संतोष काळे,गणेश डोमकावळे, देविदास हुशार,रामेश्वर बलिया,निवृत्ती आधाट,आदिनाथ घनवट,सतिश झिरपे,अमिन सय्यद,बाळा वाघ, ज्ञानेश्वर कुसळकर,सुनिल काथवटे, यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या