Ticker

6/Breaking/ticker-posts

बीड जिल्हा राष्ट्रवादीमुक्त करण्याचा प्रीतम मुंडे यांचा संकल्प

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

बीड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जसे त्यांचे विरोधक आणि टीकाकार तुटून पडत असतात, तसेच त्यांचे समर्थकही त्यांच्यावर सुस्तीसुमनांचा वर्षाव करायला थकत नाही. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रीमत मुंडे यांनी देखील मोदींची स्तुती केली. त्यांनी पंतप्रधानांच्या एका गुणाचा उल्लेख करत हा गुण मला अतिशय आवडत असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याचवेळी खासदार प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्या टीकेचे लक्ष्य केले. त्या म्हणाल्या, आपला बीड जिल्हा भ्रष्टाचारी राष्ट्रवादी काँग्रेसपासून मुक्त करायचा आहे.

खासदार प्रीतम मुंडे या मराठवाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमात बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुणाची प्रशंसा करताना म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी यांचा मला सर्वात जास्त आवडणारा गुण म्हणजे त्यांनी गेल्या ७ वर्षांत एकदाही पत्रकार परिषद घेतलेली नाही. पंतप्रधान पत्रकार परिषद घेत नाहीत म्हणून त्यांच्यावर टीका होत असते. मात्र, ते आपले काम करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे तुम्हाला फक्त दोन-चार लोक सापडतील, मात्र त्यांच्याबद्दल चांगले बोलणारे दहा लोक सापडतील. पंतप्रधान मोदी यांच्यावर कितीही टीका झाली, तरी देखील ते त्या टीकेने कधीही विचलित होत नाहीत. ते आपले काम करत राहतात, असेही खासदार मुंडे म्हणाल्या.

'धनंजय मुंडेंवर नाव न घेता टीका'
सध्या  कंत्राटदारांना हाताशी धरले जाते आणि आपणच काम केल्याचा आव आणला जातो. तशा बातम्याही पेरल्या जात आहेत. हे लोक श्रेय घेण्यासाठी पुढे असतात. ज्या रस्त्याशी त्यांचा संबंधच नाही, त्या रस्त्याच्या कामाचे श्रेयही हे आपल्याकडेच घेत आहेत, अशा शब्दात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या