लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हाधिकारी यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले असून
त्याद्वारे पैशाची मागणी होत असल्याने खळबळ उडाली आहे. असे मॅसेज ज्यांना येतील
त्यांनी जवळच्या पोलीस स्थानकात संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी.एन
पाटील यांनी केले आहे.शनिवारी रात्री उशिरा जिल्हाधिकारी कार्यलयाकडून ही माहिती
देण्यात आली.
रत्नागिरी जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांच्या
सरकारी अधिकृत Collectorate Ratnagiri या फेसबूक अकाउंटचे बनावट खाते तयार करून संबंधित व्यक्ती जनतेकडे पैशाची
मागणी करत आहे. संबंधित अकाउंट बनावट असून ब्लॉक करून मेसेज आल्यास नजीकच्या पोलिस
स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांचे
शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी फेसबुक अकाउंट काढण्यात आले आहे. अज्ञात
व्यक्तीने Collectorate Ratnagiri या नावे
बनावट अकाउंट तयार करून रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक, आधिकारी
यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याकडे पैशाची मागणी केली जात आहे. रुग्णालय
असल्याने पैशाची आवश्यकता आहे. अशा आशयाचे मेसेज मेसेंजर द्वारे अज्ञात व्यक्ती
पाठवत आहे. तरी Collectorate Ratnagiri नावे बनावट असलेल्या
अकाऊंटची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, ज्यांना अशा अकाउंट
वरून फ्रेंड रिक्वेस्ट येथील त्यांनी नजीकच्या पोलिस स्थानकाशी संपर्क साधावा असे
आवाहन जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी फेसबुक अकाउंट द्वारे केले आहे.
0 टिप्पण्या